नवी मुंबईतील कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान सोहळा

By admin | Published: March 30, 2017 07:06 AM2017-03-30T07:06:54+5:302017-03-30T07:06:54+5:30

कायदा सुव्यवस्था सांभाळण्याबरोबर गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अविरत परिश्रम करणाऱ्या पोलीस अधिकारी

Dignity of Police in Navi Mumbai | नवी मुंबईतील कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान सोहळा

नवी मुंबईतील कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान सोहळा

Next

नवी मुंबई : कायदा सुव्यवस्था सांभाळण्याबरोबर गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अविरत परिश्रम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान ‘लोकमत’च्यावतीने करण्यात येत आहे. ३१ मार्चला वाशीमध्ये कर्तृत्ववान अधिकारी व कर्मचाऱ्यांना आऊटस्टँडिंग पोलीस अ‍ॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना १९९४ मध्ये झाली. महापालिकेसह, पनवेल, उरणमधील तब्बल ९५३ चौरस किलोमीटर परिसराची जबाबदारी आयुक्तालयावर आली. जेएनपीटी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर, ठाणे बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहत, ओएनजीसी, एचपीसीएल, आयपीसीएल, बीपीसीएल, दीपक फर्टिलायझर्स, घारापुरी लेणी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, ऐरोली ते उरण, पनवेलपर्यंतचा खाडीकिनारा, ऐरोली पॉवर हाऊससह अनेक महत्त्वाचे प्रकल्प या परिसरामध्ये आहेत. मुंबईनंतर राज्यातील सर्वात महत्त्वाचा परिसर म्हणून नवी मुंबईची ओळख निर्माण झाली असून, येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायम राखण्यासाठी व गुन्हेगारी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पहिले आयुक्त के. एस. शिंदे ते विद्यमान आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी अविश्रांत मेहनत घेत आहेत. या परिश्रमामुळेच राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे सर्वात चांगले प्रमाण नवी मुंबई आयुक्तालयाचे आहे.
राज्यातील सर्वात चांगले काम करणाऱ्या नवी मुंबई आयुक्तालयातील कर्तृत्ववान अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ‘लोकमत’च्यावतीने पुरस्कार देवून गौरव केला जाणार आहे. ३१ मार्चला वाशीमधील रघुलीला मॉलमधील इंपेरियल बँक्वेट हॉलमध्ये सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्पोटर््स अ‍ॅकॅडमी या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असणार आहेत. याशिवाय अरिहंत सुपर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रोनक अ‍ॅडर्व्हटायझिंग, इंपेरियल बँक्वेट, बिझायर हेही कार्यक्रमाचा भाग असणार आहेत.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या कार्याचा सन्मान व्हावा व त्यांच्या कर्तृत्वापासून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित केला असून, यामध्ये वैयक्तिकसह सामूहिकपणे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)


कर्तृत्वाचा सन्मान
लोकमत आऊटस्टँडिंग पोलीस अ‍ॅवॉर्डसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी माजी आयुक्त व निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी निवड समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले. महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास ते वाहतूक, सायबर, अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे.

Web Title: Dignity of Police in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.