दि न . . दि न . . . दि वा ळी !
By Admin | Published: November 14, 2015 02:08 AM2015-11-14T02:08:28+5:302015-11-14T02:08:28+5:30
दिवाळी म्हटली की, फराळ, रांगोळ्या, किल्ले स्पर्धा अन फटाक्यांची आतषबाजी अस चित्र आपल्या डोळ्या समोर उभ रहातं. ठाणे जिल्ह्यात या निमित्ताने टीम लोकमतने या दीपोत्सवात काही
दिवाळी म्हटली की, फराळ, रांगोळ्या, किल्ले स्पर्धा अन फटाक्यांची आतषबाजी अस चित्र आपल्या डोळ्या समोर उभ रहातं. ठाणे जिल्ह्यात या निमित्ताने टीम लोकमतने या दीपोत्सवात काही तरी वेगळ टिपण्याचा प्रयत्न केला. यंदा अनेकांनी आपली दिवाळी आगळीवेगळी साजरी करतांना सुटीत तीन दिवसांच्या छंद वर्गाचे आयोजन केले होते. तर कुणी मुलांना वारली पेंटिंग शिकवून त्याचा इतिहास सांगितला. यात कल्याण वाहतूक पोलिसांनी उल्हासनगरच्या शासकीय वस्तीगृहातील मुलांसोबत धमाल केली. तर एका समाजसेवी संस्थेने अंध, अपंग, कुष्ठरोगीबांधवाना फराळाचे वाटप केले, तर कुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली. डोंबिवलीत किल्ले बांधणी स्पर्धाही घेतली. अशा एक ना अनेक प्रकारे हा सण आपआपल्या पद्धतीने साजरा करून वेगळा संदेश दिला.
डोंबिवली : टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजिलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यासाठी परिसरातील ३० सोसायट्या/मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यात पाथर्ली मधील अर्जुननगर कॉम्प्लेक्स च्या युवकांनी साकारलेल्या किल्ले पन्हाळदुर्गला प्रथम क्रमांकÞ, द्वितीय क्रमांक - किल्ले नळदुर्ग, अरुण निवास, जुनी डोंबिवली, तृतीय क्रमांक - किल्ले राजगड, मंगल सोसायटी, टिळकनगर तसेच उत्तेजनार्थ - किल्ले रामसेज, अनुपम सोसायटी, जिजाईनगर,आणि- किल्ले सुवर्णदुर्ग, बालगोपाल मित्र मंडळ आदींना विजेते घोषित करण्यात आले. ११ नोव्हेंबर रोजी या किल्ल्यांचे परीक्षण करण्यात आले. त्यासाठी गिरीभ्रमण प्रेमी विवेक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळातील गिरीप्रेमी श्रीधर तिम्मापूर, तन्मय गोखले, प्रथमेश खानोलकर आणि प्रथमेश जोशी यांनी केले.