बदलापूरला अपंग प्रवाशांची गैरसोय
By Admin | Published: November 18, 2016 02:46 AM2016-11-18T02:46:44+5:302016-11-18T02:46:44+5:30
बदलापूर रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना स्थानकात कोणतीही सुविधा नाही.
बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना स्थानकात कोणतीही सुविधा नाही. स्थानकात ये-जा करणेही अपंगांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे स्थानकात अपंगांसाठी सुविधा देण्याची मागणी केली जात आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या अपंगांसाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा दिलेली नाही. स्थानकात येण्यासाठी रॅम्प असणे बंधनकारक आहे. मात्र, रॅम्प तयार केलेले नाही. एवढेच नव्हे तर जिन्यावरून ये-जा करण्यासाठी तीनचाकी सायकलची आणि ती येण्याजाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. अपंग व्यक्तींना रेल्वे स्थानकावर आणायचे किंवा बाहेर न्यायचे असल्यास त्यांचे नातेवाईक किंवा मित्रांना मोठी कसरत करावी लागत आहे. अंध व्यक्तींना त्यातल्या त्यात ये-जा करताना अडचण असली तरीही ते अन्य प्रवाशांच्या सहकार्याने प्रवास करता येतो. मात्र, अपंग असलेल्या व्यक्तींना उचलून नेण्याशिवाय पर्याय नसतो. (प्रतिनिधी)