स्वाईप मशिन नादुरु स्तीने गैरसोय

By admin | Published: April 21, 2017 12:17 AM2017-04-21T00:17:22+5:302017-04-21T00:17:22+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या भवितव्यासाठी विकासात्मक पाऊल उचलून कॅशलेस इंडिया ही संकल्पना अमलात आणली.

Disadvantage of Swipe Machin Naduru Sti | स्वाईप मशिन नादुरु स्तीने गैरसोय

स्वाईप मशिन नादुरु स्तीने गैरसोय

Next

नांदगाव/ मुरुड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या भवितव्यासाठी विकासात्मक पाऊल उचलून कॅशलेस इंडिया ही संकल्पना अमलात आणली. त्याप्रमाणे संपूर्ण देश यात सहभागी होऊन कॅशलेस पद्धतीचा अवलंब करू लागला. परंतु मुरु ड येथील स्टेट बँक आॅफ इंडिया यास अपवाद असल्याचे चित्र समोर येत आहे.
मुरु ड तालुक्यातील शिघ्रे येथील पेट्रोल पंप मालक मुबीन मुन्शी यांनी आपल्या पेट्रोल पंपावरील व्यवहार कॅशलेस होण्यासाठी मुरु ड येथील स्टेट बँक आॅफ इंडियाकडून नवीन स्वाईप मशिन बसवली होती. परंतु अगदी थोड्या काळातच ही मशिन नादुरु स्त होऊन बंद पडली. याबाबत पेट्रोल पंप मालकांनी बँकेकडे वारंवार तक्र ार करून सुद्धा मशिन नादुरु स्त होत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे यावेळी मुन्शी यांनी सांगितले. ही मशिन नादुरु स्त झाल्याचे १४ फेब्रुवारी २०१७ रोजी याबाबत बँकेकडे तक्र ार अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी ही मशिन दुरु स्त करून दिली. त्यानंतर थोड्याच दिवसात ही मशिन बिघडली. यावेळी त्यांनी पुन्हा अर्ज करून दुरु स्ती तरी करा, अथवा मशिन नवीन द्या अशी मागणी केली, परंतु त्यांना याबाबत कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. मात्र या बँकेकडून स्वाईप मशिनचे भाडे वेळेवर आकारले जाते याबाबत मुन्शी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Disadvantage of Swipe Machin Naduru Sti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.