नवी मुंबईत सवलतींचा गैरफायदा; लॉकडाऊनमध्ये १० हजारांहून अधिक जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 01:14 AM2020-07-13T01:14:49+5:302020-07-13T01:15:58+5:30

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने, पालिकेच्या वतीने ४ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन आहे. या कालावधीत बाधितांची संख्या कमी न होता, ती वाढल्याने लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.

Disadvantages of concessions in Navi Mumbai; Action against more than 10,000 people in lockdown | नवी मुंबईत सवलतींचा गैरफायदा; लॉकडाऊनमध्ये १० हजारांहून अधिक जणांवर कारवाई

नवी मुंबईत सवलतींचा गैरफायदा; लॉकडाऊनमध्ये १० हजारांहून अधिक जणांवर कारवाई

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : शहरात लॉकडाऊन लागू झाल्यापासून दहा हजारांहून अधिकांवर कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या अनुषंगाने पोलिसांकडून विभागवार बंदोबस्तासह २२ ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे. यानंतरही सवलतींचा गैरफायदा घेऊन फिरणाऱ्यांमुळे पोलिसांपुढील आव्हान वाढत आहे.
शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने, पालिकेच्या वतीने ४ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन आहे. या कालावधीत बाधितांची संख्या कमी न होता, ती वाढल्याने लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सुविधांसाठी नागरिकांना सूट देण्यात आली आहे, परंतु त्याचा गैरफायदा घेऊन अनेक जण शहरात सर्वत्र वावरताना दिसत आहेत. अशांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. यानुसार, एका आठवड्यात १० हजार २७५ जणांवर मोटर वाहन, महाराष्ट्र पोलीस कायदा, तसेच इतर कायद्यांतर्गत या कारवाई करण्यात आल्या आहेत, तर विनाकारण एका विभागातून दुसºया विभागात वाहनातून फिरणाऱ्यांची २ हजार ६९२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक असतानाही, त्याला बगल देणाºया १,६०४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मास्क वापरण्याच्या सूचना करूनही तोंड न झाकणाºया ५३६ जणांवर कारवाई करण्यात आली. पालिकेकडूनही अनेकांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे. पोलिसांना पुढील आठवडाही बंदोबस्तामध्येच घालवावा लागणार आहे.

पासचा के ला
जातोय गैरवापर
- अत्यावश्यक कारणासाठी यापूर्वी काढलेले पासही अनेकांकडून वापरले जात आहेत. गाड्यांच्या दर्शनी भागावर असे पास चिटकवून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.
- त्याकरिता दुचाकीसह खासगी कारवर अत्यावश्यक सेवेतील वाहन असे स्टिकर लावून शहरभर फेरफटका मारला जात आहे. त्यात कथित सामाजिक कार्यकर्त्यांचाही सर्वाधिक समावेश आहे. यामुळे कोणालाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Disadvantages of concessions in Navi Mumbai; Action against more than 10,000 people in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.