शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

नवी मुंबईत सवलतींचा गैरफायदा; लॉकडाऊनमध्ये १० हजारांहून अधिक जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 1:14 AM

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने, पालिकेच्या वतीने ४ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन आहे. या कालावधीत बाधितांची संख्या कमी न होता, ती वाढल्याने लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरात लॉकडाऊन लागू झाल्यापासून दहा हजारांहून अधिकांवर कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या अनुषंगाने पोलिसांकडून विभागवार बंदोबस्तासह २२ ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे. यानंतरही सवलतींचा गैरफायदा घेऊन फिरणाऱ्यांमुळे पोलिसांपुढील आव्हान वाढत आहे.शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने, पालिकेच्या वतीने ४ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन आहे. या कालावधीत बाधितांची संख्या कमी न होता, ती वाढल्याने लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सुविधांसाठी नागरिकांना सूट देण्यात आली आहे, परंतु त्याचा गैरफायदा घेऊन अनेक जण शहरात सर्वत्र वावरताना दिसत आहेत. अशांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. यानुसार, एका आठवड्यात १० हजार २७५ जणांवर मोटर वाहन, महाराष्ट्र पोलीस कायदा, तसेच इतर कायद्यांतर्गत या कारवाई करण्यात आल्या आहेत, तर विनाकारण एका विभागातून दुसºया विभागात वाहनातून फिरणाऱ्यांची २ हजार ६९२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक असतानाही, त्याला बगल देणाºया १,६०४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मास्क वापरण्याच्या सूचना करूनही तोंड न झाकणाºया ५३६ जणांवर कारवाई करण्यात आली. पालिकेकडूनही अनेकांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे. पोलिसांना पुढील आठवडाही बंदोबस्तामध्येच घालवावा लागणार आहे.पासचा के लाजातोय गैरवापर- अत्यावश्यक कारणासाठी यापूर्वी काढलेले पासही अनेकांकडून वापरले जात आहेत. गाड्यांच्या दर्शनी भागावर असे पास चिटकवून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.- त्याकरिता दुचाकीसह खासगी कारवर अत्यावश्यक सेवेतील वाहन असे स्टिकर लावून शहरभर फेरफटका मारला जात आहे. त्यात कथित सामाजिक कार्यकर्त्यांचाही सर्वाधिक समावेश आहे. यामुळे कोणालाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस