रेल्वे स्थानकातील बंद इंडिकेटरमुळे प्रवाशांची गैरसोय
By Admin | Published: June 30, 2017 03:06 AM2017-06-30T03:06:54+5:302017-06-30T03:06:54+5:30
प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा मात्र आता त्रासदायक ठरत आहे. नवी मुंबईमधील परिसरातील बेलापूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा मात्र आता त्रासदायक ठरत आहे. नवी मुंबईमधील परिसरातील बेलापूर, सीवुड्स, नेरुळ, जुईनगर, सानपाडा आदी रेल्वे स्थानकांतील लोकलची वेळ दर्शविणारे इंडिकेटर ऐन पावसाळ््यात बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडत असून देखभाल दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
घड्याळाच्या काट्यांवर चालणाऱ्या नोकरदारवर्गाला रेल्वे स्थानकात वेळेबाबत तसेच लोकलविषयीचा सूचनाच कळत नसल्याची तक्र ार प्रवाशांनी केली आहे. स्थानकातील सध्याची वेळ तसेच लोकलची वेळ दाखविणारे इंडिकेटर अकार्यक्षम असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नादुरुस्त इंडिकेटरमुळे फलाटावर आलेली लोकल नेमकी कुठली आहे यासाठी कसरत करावी लागते. या मार्गावरून रोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदार महिलांनी लोकलच्या मार्गाची खात्री करण्यासाठी जीव धोक्यात घालून फलाटावर प्रवेश करणाऱ्या लोकलवर लिहिलेला मार्ग पाहवा लागतो.
अनेकदा रेल्वेचा मार्ग न कळाल्याने पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांना सीएसटी-बेलापूर या लोकलमध्ये चढत असल्याने पुन्हा फलाटावरून उतरून बेलापूर-पनवेल लोकल गाठावी लागते. उद्घोषणेच्या नावानेही बोंबाबोब असल्याने नवीन प्रवाशांना गोंधळून टाकते. या नादुरु स्त इंडिकेटरकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष केले जाते त्यामुळे सीएसटी-पनवेल तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.