पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 12:31 PM2018-03-26T12:31:31+5:302018-03-26T12:32:19+5:30

पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव सोमवारी मंजूर करण्यात आला आहे. महापालिकेच्या सभागृहात ठराव पास करण्यासाठी मतदान घेण्यात आहे. यावेळी 50 विरुद्ध 22 मतांनी ठराव पास करण्यात आला.

Disapproving resolution against Panvel Municipal Commissioner Sudhakar Shinde | पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देआयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर50 विरुद्ध 22 मतांनी ठराव पास करण्यात आलासत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने केले मतदान

पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव सोमवारी मंजूर करण्यात आला आहे. 
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी सोमवारी विशेष सभा बोलाविली होती. महापालिकेच्या सभागृहात ठराव पास करण्यासाठी मतदान घेण्यात आहे. यावेळी 50 विरुद्ध 22 मतांनी ठराव पास करण्यात आला. सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले, तर विरोधी पक्ष असलेल्या शेकापने याविरोधात मतदान केले. 
दरम्यान, आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली होवू नये, यासाठी पनवेलमधील सामाजिक संस्था एकवटल्या होत्या. त्यांच्याच पुढाकारातून आयुक्त डॉ. शिंदे यांच्या समर्थनार्थ गेल्या आठवड्यात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आयुक्तांच्या प्रति विश्वासदर्शक ठराव पारित केला जाणार होता. या सभेला भाजपासह शेकापचेही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु ऐनवेळी पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्याने आयोजकांनी संताप व्यक्त केला. असे असले तरी कोणतीही भाषणबाजी न करता मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पनवेलकरांनी तोंडाला काळ्या फिती लावून हात वर करून आयुक्तांवरील विश्वासदर्शक ठराव पारित केला होता.

Web Title: Disapproving resolution against Panvel Municipal Commissioner Sudhakar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल