पनवेलच्या आयुक्तांविरोधात आज अविश्वास ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 02:40 AM2018-03-26T02:40:00+5:302018-03-26T02:40:00+5:30
पनवेल महापालिकेत सत्ताधारी भाजपा आणि आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यातील वाद अविश्वास ठरावापर्यंत येऊन ठेपला आहे.
पनवेल : पनवेल महापालिकेत सत्ताधारी भाजपा आणि आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यातील वाद अविश्वास ठरावापर्यंत येऊन ठेपला आहे. सोमवार, २६ मार्च रोजी विशेष सभा बोलावून सत्ताधारी भाजपा आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करणार आहे. महापालिकेतील विरोधक ठरावाच्या विरोधात मतदान करणार आहेत.
पनवेल महानगर पालिकेत एकूण ८४ नगरसेवकांपैकी ५१ नगरसेवकांचे संख्याबळ भाजपाकडे आहे. आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपाला ४९ या मतांची आवश्यकता आहे. भाजपाचा निषेध करण्यासाठी शेकाप नगरसेवक अनोखे आंदोलन करणार आहे. विरोधी पक्षातील नगरसेवक मुंडण करून आयुक्तांना समर्थन दर्शवणार आहेत. तर काही सामाजिक संघटनांकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करणार आहेत. पनवेल, खारघरमध्ये नागरिकांनी आयुक्तांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबवली आहे.