शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

‘त्या’ चालकाविरोधात असंतोष; परिवहनचे पोलिसांना पत्र, जीवे ठार मारल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 3:53 AM

एनएमएमटी बस चालकास धमकी देऊन ट्रकने बसला धडक दिल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून दोषी ट्रक चालकाविरोधात जीवे ठार मारण्याची धमकी

नवी मुंबई : एनएमएमटी बस चालकास धमकी देऊन ट्रकने बसला धडक दिल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून दोषी ट्रक चालकाविरोधात जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनाने केली आहे.सायन-पनवेल महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. ट्रक (एमएच ०४ जीए २८६८)वरील चालकाने तुर्भे नाक्यावर एनएमएमटी बस चालकाशी वाद घातला. पुलावर चालू बसला एक वेळ धडक दिली. बस ‘लोकमत’ कार्यालयासमोरील बसस्टॉपवर उभी राहिल्यानंतर ट्रकचालकाने पुन्हा बसचालकास धमकावले व ट्रक रिव्हर्स घेऊन प्रवासी बसलेल्या बसला धडक दिली. या घटनेविषयी वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शहरामध्ये खळबळ उडाली आहे. एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून याप्रकरणी जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एनएमएमटीच्या अधिकाºयांनी उपआयुक्तांसह सहायक आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची भेट घेऊन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. परिवहन व्यवस्थापनाने दिलेल्या पत्राच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद शहरामध्येही उमटले आहेत. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने काढलेला व्हिडीओ सोशल मीडियातून शहरभर पसरला. ट्रकचालकाच्या वर्तनाचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.व्यवस्थापनाची कडक भूमिकाट्रकचालकाच्या गुंडगिरीची गंभीर दखल परिवहन व्यवस्थापनाने घेतली आहे. परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी स्वत: परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त सुधाकर पठारे यांच्याशी संपर्क साधला व कारवाईची मागणी केली. उपआयुक्तांना लेखी पत्रही दिले असून त्या पत्राच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.डंपरची एनएमएमटीला धडकसानपाडामधील घटनेनंतर शनिवारी वाशी-बामनडोंगरी मार्गावर मोरावेजवळ डंपरने एनएमएमटीला धडक दिली. एमएच ४३ एआर ८११७ वरील डंपरने दिलेल्या धडकेमध्ये बसचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई