अशुद्ध दिशादर्शक फलकांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 03:39 AM2017-07-22T03:39:26+5:302017-07-22T03:39:26+5:30

शहरात एमएमआरडीएने लावलेले दिशादर्शक फलक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फलकामध्ये शहरातील महत्त्वाच्या ठिकाणाचा चुकीचा उल्लेख केला

Discussion of mischief boards | अशुद्ध दिशादर्शक फलकांची चर्चा

अशुद्ध दिशादर्शक फलकांची चर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : शहरात एमएमआरडीएने लावलेले दिशादर्शक फलक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फलकामध्ये शहरातील महत्त्वाच्या ठिकाणाचा चुकीचा उल्लेख केला असून या नावांमध्ये प्रचंड अशुद्ध लेखन असल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. पनवेल महापालिकेवर या फलकावरून टीका होत असून संबंधित फलक हे एमएमआरडीएने लावले असल्याचा खुलासा पनवेल महानगर पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
फलकामध्ये बावन बंगला रोड जवळ लावलेल्या पनवेल न्यायालयाचा ‘पनवेल न्यायाल्य’ असा उल्लेख करण्यात आला आहे. बस स्थानकाचा पनवेल बस ‘स्थानकोड’, जुना ठाणा नाका रोडवरील ज्येष्ठ नागरिक सभागृहाचा उल्लेख ‘जेष्ठ नागरिक सभाग्रह’, दिवाळे तलावाचा देवाले ‘तळाव’ अशाप्रकरच्या अशुद्ध लेखनाच्या हास्यास्पद चुका असल्याने संबंधित फलक सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आदी सोशल मीडियावरील साइटवर हे फलक शेअर केले जात आहेत.
पनवेल शहरात नुकतेच एमएमआरडीएच्या वतीने चाळीस कोटी रु पये खर्चून रस्ते काँक्र ीटीकरण केले आहेत. मात्र रस्त्यांची जेवढी चर्चा झाली नाही, चर्चा फलकांची सुरू आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असताना शासनाची यंत्रणा असलेल्या एमएमआरडीएने अशा चुका केलेल्या योग्य नसल्याची प्रतिक्रि या सोशल मीडियावर उमटत आहे.

Web Title: Discussion of mischief boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.