तळोजा येथे २.१६ कोटींच्या २८ किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट; मुंबई सीमा शुल्क विभागाची कारवाई
By नारायण जाधव | Published: October 17, 2023 12:35 PM2023-10-17T12:35:15+5:302023-10-17T12:35:29+5:30
सध्या सुरू असलेल्या विशेष मोहिमेत APSC आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन ३ ने जप्त केलेले हे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले
नवी मुंबई - मुंबईच्या सीमा शुल्क विभागाने विविध कारवाया आणि छापे मारून जप्त केलेल्या दोन कोटी १६ लाख रुपये किमतीच्या अंमली पदार्थ तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रकल्पात नष्ट करण्यात आले.
कायदेशीर प्रकिया करून शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांची रितसर विल्हेवाट लावल्याचे सीमा शुल्क विभागाने सोशल मीडियाद्वारे कळविले आहे. सध्या सुरू असलेल्या विशेष मोहिमेत APSC आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन ३ ने जप्त केलेले हे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. यामध्ये गांजा, कोकेन, चरस, ट्रामाडोल आणि इफेड्रिन यासह २८ किलो NDPS पदार्थांचा समावेश आहे. विल्हेवाट लाललेल्या अंमली पदार्थांची किंमत अंदाजे दोन कोटी १६.लाख रुपये आहे. तळोजा येथील केंद्रात ते सोमवारी नष्ट केले