सुशोभीकरणाच्या कामात जीएसटीचा अडथळा, आदई तलावाच्या कामाला ठेकेदाराचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:49 AM2018-03-17T02:49:22+5:302018-03-17T02:49:22+5:30

रहिवाशांना क्षणभर विश्रांती त्याचबरोबर विरंगुळ्याकरिता आदई तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी रामशेठ ठाकूर विचार मंचाने केली होती. त्यानुसार आराखडा तयार करून निविदा प्रक्रि या सुध्दा झाली होती, परंतु जीएसटीमुळे संबंधित एजन्सीने माघार घेतली आहे. त्यामुळे काम रखडले आहे.

Disruption of GST in beautification work, contractor's refusal to work on Adi Talao | सुशोभीकरणाच्या कामात जीएसटीचा अडथळा, आदई तलावाच्या कामाला ठेकेदाराचा नकार

सुशोभीकरणाच्या कामात जीएसटीचा अडथळा, आदई तलावाच्या कामाला ठेकेदाराचा नकार

Next

कळंबोली : रहिवाशांना क्षणभर विश्रांती त्याचबरोबर विरंगुळ्याकरिता आदई तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी रामशेठ ठाकूर विचार मंचाने केली होती. त्यानुसार आराखडा तयार करून निविदा प्रक्रि या सुध्दा झाली होती, परंतु जीएसटीमुळे संबंधित एजन्सीने माघार घेतली आहे. त्यामुळे काम रखडले आहे.
नवीन पनवेल येथे सध्या जो तलाव आहे तो आदई गावच्या हद्दीत होता. अतिशय विस्तीर्ण असलेल्या या तलावाचा बराचसा भाग बुजविण्यात आला. द्रुतगती महामार्गामुळे तलावाला मोठा फटका बसला, परिणामी नवीन पनवेलमध्ये विजय मार्गालगत आदईच्या तलावाचा काही भाग शिल्लक राहिलाय. सिडकोने हा उरलेला तलावही बुजून टाकण्याचा पाच वर्षांपूर्वी घाट घातला. या ठिकाणी भूखंड तयार करून एका संस्थेच्या घशात घालून कोट्यवधी रुपयांची मलई खायचा उद्देश सिडकोतील अधिकाऱ्यांचा होता. मात्र स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी स्थानिकांना बरोबर घेऊन सिडकोच्या या धोरणाविरोधात चळवळ उभी केली. संबंधित तलाव बुजू नये याकरिता शेट्टी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी नात्याने सिडकोवर दबाव आणला याशिवाय आजूबाजूच्या लोकांना त्यांनी जागृत केले. यामुळे तलाव बुजविण्याचा निर्णय बासनात बांधून ठेवावा लागला.
या ठिकाणी गणपतींचे विसर्जन त्याचबरोबर छट पूजा होत असल्याने या जलाशयाला अधिक महत्त्व प्राप्त आहे. वास्तविक पाहता तलावाची साफसफाई आणि देखभाल करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. असे असतानाही प्रशासनाकडून याबाबत कानाडोळा केला जात होता. या तलावात मोठ्या प्रमाणात कचरा त्याचबरोबर डेब्रिज टाकण्यात येते. लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
>सुशोभीकरण कधी होणार?
स्थानिक रहिवाशांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण उत्तम आहे. म्हणून श्री. रामशेठ ठाकूर विचार मंचाच्या माध्यमातून हा तलाव आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यात सदैव तत्पर असतात. याकरिता ते सिडकोकडे डोळे लावून बसत नाही. या तलावाचे सुशोभीकरण करावे असा प्रस्तावही सिडको प्रशासनाकडे दिला असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे किशोर चौतमोल यांनी सांगितले. यासंदर्भात सिडकोच्या तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक व अधिकाºयांकडे वारंवार बैठकाही झाल्या. त्यांनी सुशोभीकरणाबाबत हिरवा कंदील दिला होता. याबाबत आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र महापालिका स्थापन झाल्यानंतर हा प्रस्ताव मागे पडला.त्याचबरोबर जीएसटीचा फटका बसला.
या ठिकाणी गणपतींचे विसर्जन त्याचबरोबर छट पूजा होत असल्याने या जलाशयाला अधिक महत्त्व प्राप्त आहे.
तलावाची साफसफाई आणि देखभाल करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. असे असतानाही प्रशासनाकडून याबाबत कानाडोळा केला जात होता.
आदई तलावाच्या सुशोभीकरणाची निविदा प्रक्रि या झाली होती, परंतु संबंधित ठेकेदाराने जीएसटी करामुळे हे काम परवडणार नाही असे कारण देवून माघार घेतली. त्यामुळे हा आराखडा आणि इस्टिमेटमध्ये बदल करण्यात येईल. त्यानंतर नव्याने निविदा सिडको प्रसिध्द करेल.
- भगवान साळवी,
कार्यकारी अभियंता,
सिडको नवीन पनवेल नोड

Web Title: Disruption of GST in beautification work, contractor's refusal to work on Adi Talao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.