कर्तृत्ववान महिलांचा आज सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 11:47 PM2019-07-19T23:47:25+5:302019-07-19T23:47:45+5:30

एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

Distinguished women honored today | कर्तृत्ववान महिलांचा आज सन्मान

कर्तृत्ववान महिलांचा आज सन्मान

Next

नवी मुंबई : एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा काकणभर सरस कामगिरी त्या करत आहेत. स्वत:च्या हिमतीवर आणि स्वबळावर यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजित केला जाणारा ‘लोकमत सखी सन्मान’ उद्या, शनिवारी नवी मुंबईत नेरुळ येथे पार पडणार आहे़ तेरणा डेंटल कॉलेजच्या आॅडिटोरियममध्ये संध्याकाळी ५ वाजल्यापासून हा सोहळा रंगेल़
महिला सक्षमीकरणात सदैव अग्रेसर असलेल्या ‘लोकमत’ समूहातर्फे मुंबई शहरातील ध्येयवेड्या व सेवाव्रती महिलांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी व त्यांचा ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक, शौर्य, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, व्यावसायिक-औद्योगिक, कला आणि साहित्य अशा विविध क्षेत्रातील स्त्रियांना सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय ‘लोकमत’ सखी मंचतर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रायोजक तेरणा हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, पार्टनर विजय नाहटा फाउंडेशन आणि पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. सहप्रायोजक आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे उपस्थित राहणार आहेत, तसेच सिनेअभिनेत्री मुक्ता बर्वे, नामवंत फॅशन डिझायनर व दिग्दर्शक विक्रम फडणीस हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेंटमेंट प्रस्तुत सनशाईन फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावर प्रोडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ या मराठी चित्रपटाच्या कलाकारांबरोबर संवाद साधला जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने करणार आहेत़
आयुष्यातील अंधार सकारात्मक विचारांनी कशा प्रकारे दूर करू शकतो, आपल्या विचारांवर कसे नियंत्रण ठेवू शकतो, यावर भाष्य करणारा हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.
पुरस्कार सोहळा ‘लोकमत’ वृत्तसमूहाच्या सर्वच वाचकांसाठी आणि ‘सखी मंच’च्या सर्व सभासदांसाठी खुला असून, वाचकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने केले आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात आशिमिक कामठे प्रस्तुत ‘वारसा माझ्या कलेचा’ या स्त्रीशक्तीवर आधारित कार्यक्रमाद्वारे होणार आहे.
>कार्यक्रमाचे आकर्षण
कनिरा आर्ट्सचे कलाकार सप्तसुरांची मैफील हा सांगीतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
तेरणा हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून, विजय नाहटा फाउंडेशन हे पार्टनर आहेत. तर सहप्रोयाजक पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. आहेत.

Web Title: Distinguished women honored today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.