शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

शहाबाजमधील भूखंड वितरणात गैरव्यवहार !

By admin | Published: January 25, 2017 5:01 AM

शहाबाजमधील साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वितरीत करण्यात आलेल्या भुखंडांची माहिती देण्यास सिडको प्रशासन टाळाटाळ करत आहे.

नवी मुंबई : शहाबाजमधील साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वितरीत करण्यात आलेल्या भुखंडांची माहिती देण्यास सिडको प्रशासन टाळाटाळ करत आहे. माहिती अधिकाराचा वापर करून सहा महिने पाठपुरावा केल्यानंतर त्रयस्थ व्यक्तीची माहिती देता येत नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. यामुळे भुखंड वितरणात गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.आग्रोळी येथील प्रकल्पग्रस्त व काँगे्रसचे पदाधिकारी सुधीर पाटील यांनी शहाबाज मधील साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वितरीत केलेल्या भुखंडांचा तपशील मागीतला होता. यासाठी २८ जुनला त्यांनी माहिती अधिकाराचा वापर करून अर्ज दिला होता. यानंतर सहा महिने सातत्याने पाठपुरावा करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. माहिती संकलीत करण्यात येत असल्याचे लेखी उत्तर दिले होते. पण प्रत्यक्षात माहिती दिलीच नाही. यासाठी कोकण माहिती आयुक्तांपर्यंत अपील दाखल केले आहे. पण अद्याप माहिती दिलेली नाही. याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच सिडको प्रशासनाने तातडीने माहिती अधिकाराचा उत्तर दिले आहे. मागीतलेली माहिती त्रयस्थ व्यक्तीची असून ती देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडाविषयी संपूर्ण अभिलेखाचे स्कॅनींग करण्यात आले आहे. सर्व माहिती किआॅस्क मशीनवर उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे. यामुळे काही माहिती हवी असल्यास किआॅस्कवरून घ्यावी. त्रयस्त व्यक्तीची माहिती देता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या उत्तरामुळे सिडको प्रशासनाच्या हेतूवरच संशय व्यक्त केला जात आहे. त्रयस्त व्यक्तीची माहिती देता येत नसेल तर एवढे उत्तर देण्यासाठी सहा महिन्याचा अवधी का लागला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहाबाज गावातील भुखंड वाटपामध्ये गैरव्यवहार झाला असण्याची शक्यताही व्यक्त केली जाऊ लागली आहे. (प्रतिनिधी)