शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘संविधान दिन’ उत्साहात !

By admin | Published: November 27, 2015 2:06 AM

देशात २६ नोव्हेंबर १९४९ पासून भारताचे संविधान अंमलात आले. या दिवसाचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद

देशात २६ नोव्हेंबर १९४९ पासून भारताचे संविधान अंमलात आले. या दिवसाचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद, सिव्हील रूग्णालय, महापालिका व नगरपालिकांसह जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये‘संविधान दिन’ विविध कार्यक्रमांव्दारे साजरा करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, यांच्या नेतृत्वाखाली हा दिन साजरा झाला. तर न्यायालय अवारातील जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात संविधान प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन झाले. यामध्ये प्राधिकरण सचिव रत्नाकर साळगांवकर, अ‍ॅड. त्रिंबक कोचवाड, मदन ठक्कर, सेवानिवृत्त न्यायाधीश ज्ञानेश्वर मेढे यांनी सहभाग घेतला.तर जिल्हा माहिती अधिकारी अनिरूध्द अष्टपुत्रे यांनी त्यांच्या कार्यालयातही कर्मचाऱ्यांसमवेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. ठाणे पोलिसांतर्फे संविधान दिन साजराडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच भारत एकसंघ राहिला आहे. आज या देशात जी एकरु पता आहे. त्यामागे या देशाच्या संविधानाची महत्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी केले. मुंब्रा पोलीस पोलीस ठाण्यात संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त विक्र म पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र तायडे हेही उपस्थित होते. या कार्यक्र माचे आयोजक तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी अत्यंत उद्बोधक शैलीमध्ये संविधान आणि संविधानाच्या निर्मितीमागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिश्रमाची माहिती दिली. बाबासाहेबांनी दोन वर्षे ११ महिने आणि १७ दिवस अहोरात्र मेहनत करुन या देशाला लोकशाही प्रदान केली. ही लोकशाही त्यांनी २६ नोव्हेंबर १९४९ ला देशाला अर्पण केली. त्यामुळेच आजची प्रजासत्ताक लोकशाही आपण अनुभवत आहोत. याची आपण जाणीव ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले. संविधान दिनाच्या अनुषंगाने दारु ल फलाह मशिद ते पोलीस ठाणे दरम्यान संविधान गौरव रॅलीही काढण्यात आली होती. याशिवाय, ठाणे पोलीस आयुक्तालयातील कोपरी, कळवा, वागळे इस्टेट अशा सर्वच ३३ पोलीस ठाणे आणि पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यानिमित्त संविधानाप्रति आत्मीयता आणि सद्भाव व्यक्त करण्यात आला. खर्डी : खर्डी हायस्कूल मध्ये संविधान दिन कार्यक्र म ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नरेंद्र पाटील याच्या अध्यक्षते खाली साजरा करण्यात आला यावेळी भारतिय संविधानाचे पूजन व भारितय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब अांबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पमाला मान्यवराच्या हस्ते अर्पण करण्यात आली. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक विलास साळवे व शांताराम निकम सर यांनी संविधान निर्माण कार्यात डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल तसेच आभ्यास पूर्ण केलेले लिखाणाबाबत, संविधानामध्ये देशातील प्रत्येक नागरीकांना दिलेले मुलभूत अधिकार, संविधान तयार करताना घेतलेले परीश्रम या बाबतची सविस्तर माहीती दिली. कार्यक्र माला शाळेचे पर्यवेक्षक अशोक मालुंजकर तसेच शिक्षक वृंद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहापूर : संविधान देशाला अर्पण केल्याच्या घटनेला ६५ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने तालुक्यातील शहापूर, किन्हवली, डोळखांब, शेणवे, कसारा, खर्डी, आटगांव, भातसानगर, वासिंद, अघई, आसनगाव मध्ये ग्रामपंचायत व शासकीय कार्यालयांत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक संस्थानी ठिकठिकाणी कार्यक्र मांचे आयोजन केले होते. बुधाजी वाढविंदे यांच्या वनश्री सामाजिक संस्थेने शहापूर शहरात संविधानफेरी काढून जाहीर कार्यक्र मा ठिकाणी संविधान ग्रंथाचे वाटप केले.कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात तसेच महापालिकेच्या शाळेमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापालिका मुख्यालयात उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमहापौर विक्रम तरे, आयुक्त ई रवींद्रन, अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. डोंबिवलीतील महापालिकेच्या पंडीत मदन मोहन मालवीय या हिंदी माध्यमाने देखील हा दिवस साजरा केला. यात विद्यार्थ्यांच्या वतीने शहरात रॅली काढली होती. श्रीमती पार्वतीबाई सखाराम जोंधळे विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील रॅली काढली. कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त संजय जाधव यांच्यातर्र्फे आचार्य अत्रे रंगमंदिरात भारतीय राज्यघटना या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. केंद्र शासनाच्या श्रम रोजगार मंत्रालयाचे प्रादेशिक संचालक सिद्धार्थ मोरे यांनी यावेळी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील परिस्थिती आणि राज्यघटनेची निर्मिती यावर प्रकाश टाकला.