शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

शहरातील अमली पदार्थांचे विघ्न दूर होणार

By admin | Published: September 13, 2016 3:04 AM

शहरवासियांवरील अमली पदार्थांचे विघ्न दूर करण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. २०१५ मध्ये वर्षभरामध्ये २६ गुन्हे दाखल करण्यात आले होते.

नामदेव मोरे , नवी मुंबई शहरवासियांवरील अमली पदार्थांचे विघ्न दूर करण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. २०१५ मध्ये वर्षभरामध्ये २६ गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु यावर्षी तीन महिन्यातच विक्रमी १६ गुन्हे दाखल झाले आहेत. दोन वर्षानंतर एमडी पावडरची विक्री करणाऱ्या आरोपीलाही अटक केली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. नैना परिसर, प्रस्तावित विमानतळ, जेएनपीटीमुळे पुढील काही वर्षात ५० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या परिसरात होणार आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण तालुक्यातील या विकासामुळेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी या परिसरात बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. गांजा, गुटख्यापासून एमडी पावडरची (मेफेड्रॉन) विक्री होऊ लागली आहे. उच्च शिक्षणाचे सर्वात मोठे केंद्र म्हणूनही नवी मुंबईची ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी याठिकाणी येत आहेत. या विद्यार्थ्यांनाही अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढले जात आहे. सिगारेटमधील तंबाखू काढून त्याऐवजी गांजाचा वापर करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. शिक्षणासाठी आलेले अनेक तरूण गांजा कुठे मिळेल, याच्या शोधात फिरत असतानाचे चित्र दिसू लागले होते. अमली पदार्थांचा विळखा घट्ट होऊ नये, यासाठी पोलिसांनी स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक सुरू केले आहे. यापूर्वी खंडणी विरोधी पथकाकडून अंमलीपदार्थांवर कारवाई केली जात होती. परंतु जूनमध्ये स्वतंत्र पथक तयार केले असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. पाच वर्षामध्ये सर्वाधिक कारवाई २०१६ मध्ये झाली आहे. या वर्षभरामध्ये एनडीपीएस अंतर्गत २९ गुन्हे दाखल झाले आहेत. यामधील १६ गुन्हे जूनपासून दाखल झाले आहेत. जवळपास ४३ आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. जूनपासून शहरातील गांजाचे बहुतांश सर्व प्रमुख अड्डे बंद झाले आहेत. गांजा माफिया टारझनसह अनेकांना गजाआड केले आहे. शहरात एमडी पावडरची विक्री होत असल्याची माहीतीही अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ट पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक माया मोरे, पोलीस उपनिरीक्षक अमीत शेलार, राणी काळे व पथकाने तपास सुरू केला होता. ११ सप्टेंबरला रबाळे एमआयडीसीतील अपार इंडस्ट्रीज कंपनीजवळ एकजण एमडी पावडर विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दुपारी दोन वाजता धाड टाकून राफे उर्फ रफिक कदीर खान याला अटक केली आहे. त्याची अंगझडती घेतली असता ४ लाख ३७ हजार किमतीची १७५ ग्रॅम एम. डी. पावडर सापडली. जवळपास दोन वर्षानंतर एमडी पावडर विकणाऱ्यास अटक झाली आहे. पोलिसांचे टिमवर्क टिमवर्कमुळे कारवाईमध्ये सातत्य निर्माण झाले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील गजानन पडळकर, इशार खरोटे, रवींद्र राऊत, कासम पिरजादे,संजयसिंग ठाकूर, मनोज जाधव, अश्विनी चिपळूणकर, सचीन भालेराव,राजेश गाढवे, महेश गवळी, अमोल कर्डीले, अमोर गागरे, सुप्रिया ठाकूर, आकाश मुळे व गोपाळ चव्हाण यांनीही महत्वाची भुमीका बजावली आहे.