पनवेल : पनवेल महापालिकेने दिव्यांग व्यक्तींच्या टपऱ्यांवर कारवाईचे संकेत दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सोमवारी सामाजिक संघटनेसह शहरातील दिव्यांग व्यक्तींनी महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. आयुक्त गणेश देशमुख यांनी दिव्यांगांची दुपारी भेट घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.पनवेल महापालिका क्षेत्रात हजारोंच्या संख्येने नोंदणीकृत दिव्यांग आहेत. महापालिकेने फेरीवाला धोरण निश्चित केले नसल्याने अनेक दिव्यांग व्यक्तींनी ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला टपरी टाकून खाद्यपदार्थ, कटलरी वस्तू, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.कामोठेमधील टपºया हटवण्याचे सांगण्यात आल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व दिव्यांग टपरीधारक धास्तावले आहेत. दरम्यान, फेरीवाला धोरण निश्चित करावे, दिव्यांगांच्या टपऱ्यांना संरक्षण द्यावे आदी प्रमुख मागणीसाठी सोमवारी मुख्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी स्व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मंगेश मालोंडकर, सहसचिव अविनाश बुधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रलंबित मागण्यांसाठी पनवेल महापालिकेवर दिव्यांगांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:18 PM