बिद्रे प्रकरणात पुन्हा डीएनए चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 05:26 AM2018-10-24T05:26:07+5:302018-10-24T05:26:09+5:30

अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी डीएनए चाचणीकरिता त्यांच्या मुलीचे रक्त मंगळवारी घेण्यात आले.

DNA test again in Bidre case | बिद्रे प्रकरणात पुन्हा डीएनए चाचणी

बिद्रे प्रकरणात पुन्हा डीएनए चाचणी

Next

नवी मुंबई : अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी डीएनए चाचणीकरिता त्यांच्या मुलीचे रक्त मंगळवारी घेण्यात आले. अभय कुरुंदकरच्या घरातील वस्तूंवरून डीएनए चाचणी केली होती. तो अहवाल नकारात्मक आल्याने तपासावर संशय व्यक्त करत, बिद्रे यांचे पती राजू गोरे व भाऊ आनंद बिद्रे यांनी नव्याने चाचणीची मागणी केली होती. तत्कालीन आयुक्त हेमंत नगराळे यांनी ती नाकारली. पण, आयुक्त संजय कुमार यांनी परवानगी दिल्याने, बिद्रे यांच्या मुलीच्या रक्ताद्वारे घटनास्थळावरील वस्तूंच्या नमुन्याची डीएनए चाचणी झाली. त्यासाठी बांद्रा येथील ट्युथ लॅबमार्फत मंगळवारी सकाळी मुलगी सूचीचे रक्त घेतले दिल्लीत त्याची तपासणी होणार आहे.त त्याचा बंदिस्त अहवाल पोलीस आयुक्तांना पाठविला जाणार आहे.

Web Title: DNA test again in Bidre case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.