...जो गुलाल उधळला, त्याचा अपमान होऊ देऊ नका; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्याना विनंती
By योगेश पिंगळे | Published: January 27, 2024 01:20 PM2024-01-27T13:20:58+5:302024-01-27T13:23:08+5:30
मराठा आरक्षणातील मागण्यांचा शासनाने काढलेला अध्यादेश वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी झालेल्या सभेत जरांगे बोलत होते.
नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या लढाईत सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश शासनाने काढला आहे. त्यासाठी मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानत मनोज जरांगे पाटील यांनी या जीआरमुळे जो गुलाल उधळला त्याचा अपमान होऊ देऊ नका अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. मराठा आरक्षणातील मागण्यांचा शासनाने काढलेला अध्यादेश वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी झालेल्या सभेत जरांगे बोलत होते.
शपथपत्र घेऊन प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा, गृहचौकशीसाठी अडवू नका अशी विनंती देखील यावेळी त्यांनी केली. मराठा समाजातील जास्तीत जास्त नागरिकांना प्रमाणपत्र मिळावे यासाठी शिंदे समितीला टप्याटप्याने १ वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. गावखेड्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाज गोण्या-गोविंदाने एकत्र राहतो नेते, आमच्यात भांडणे लावत असल्याचा आरोप करत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे यांनी शुक्रवार पासून सुरु केलेले उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस घेत सोडले.
देशाचंच नव्हे तेर संपूर्ण जागाच लक्ष या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागले होते. लाखोंच्या आंदोलन कोणतेही गालबोट न लागता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात यशस्वी केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आंदोलनामुळे इतर कोणाला त्रास होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून जरांगे पाटील आणि सर्व आंदोलकांनी घेतल्याचे ते म्हणाले. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती असल्याचे सांगत मराठवाड्यात कुणबी नोंदी आधी सापडत नव्हत्या आता सापडू लागल्या आहेत. सरकारची मानसिकता देण्याची आहे घेण्याची नसल्याचे शिंदे म्हणाले.
सर्वसामान्य माणूस जेव्हा आंदोलनाचं नेतृत्व करतो तेव्हा त्याला वेगळेपण येते. हा मुख्यमंत्रीसुद्धा एक सामान्य माणूस आहे म्हणून सामान्य माणसांना न्याय देण्याचे काम आम्ही केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आजचा दिवस हा आनंदाचा दिवस, गुलाल उधळण्याचा दिवस असल्याचे ते म्हणाले. यावेळी आंदोलकांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. जेसीबीतून पुष्टवृष्टी आणी गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर आणि लाखोंच्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.