आयुक्तांचा अधिका-यांवर भरोसा न्हाय का ? पाहणीच्या निमित्ताने कामांना होतोय विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 06:10 AM2017-09-30T06:10:18+5:302017-09-30T06:10:26+5:30
एका अधिका-याने प्रस्तावित नागरी कामाची पाहणी करुनही पुन्हा आयुक्त अथवा इतर अधिका-यांकडून त्याच कामाची पाहणी होत आहे. यामुळे कामांच्या पाहणीच्या निमित्ताने त्यास मंजुरी मिळण्याला विलंब होत आहे.
नवी मुंबई : एका अधिका-याने प्रस्तावित नागरी कामाची पाहणी करुनही पुन्हा आयुक्त अथवा इतर अधिकाºयांकडून त्याच कामाची पाहणी होत आहे. यामुळे कामांच्या पाहणीच्या निमित्ताने त्यास मंजुरी मिळण्याला विलंब होत आहे. याबाबत स्थायी समितीमध्ये चर्चा करताना, आयुक्तांचा अधिकाºयांवर भरोसा न्हाय का ? असा सूर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी काढला.
शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत नेरुळ विभागातील भूखंड क्रमांक ५१ ते तुर्भे उड्डाणपूलपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने नगरसेवक अशोक गुरखे, नामदेव भगत यांंनी इतरही आवश्यक नागरी कामांविषयी सभागृहात चर्चा केली. मात्र प्रशासनाच्या अधिकाºयांचाच एकमेकांवर भरोसा राहिलेला नसल्याची टीका नगरसेविका ऋ चा पाटील यांनी केली. लोकप्रतिनिधीने सुचवलेल्या एखाद्या कामाची पाहणी एका अधिकाºयाने केल्यानंतरही त्या कामाची पाहणी इतर अधिकाºयांसह आयुक्तांकडून होत आहे. यामुळे केवळ पाहणीच्या निमित्ताने प्रस्तावित कामांचा निर्णय लांबणीला जात आहे. अशाच प्रकारे सानपाडा येथील अनेक कामे रखडली असून, याबाबत नागरिक लोकप्रतिनिधींना जाब विचारत असल्याचीही खंत ऋ चा पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी आयुक्तांंनी ठरवले तर एखाद्या कामाची फाईल एका दिवसात तयार होते. मात्र लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांच्या फायली महिनोमहिने पडून राहत आहे. यामुळे चर्चेच्या बहाण्याने प्रशासनात नवा पायंडा पडत चालला असल्याचाही संताप नगरसेवक नामदेव भगत यांनी व्यक्त केला.
सभापती शुभांगी पाटील यांनी देखील प्रशासनाला जनतेची कामे करायची आहेत की नाही असाच प्रश्न निर्माण झालेला असल्याचा टोला मारला. यावेळी प्रशासनाची भूमिका मांडताना शहर अभियंता मोहन डगावकर यांनी संपूर्ण शहरातील रस्त्यांची कामे केली जाणार असून, प्राधान्याने प्रथम प्रमुख रस्त्यांची कामे केली जात असल्याचे सभागृहात सांगितले.
तसेच रस्त्यालगत डक्ट बसवण्याचे धोरण प्रशासन घेत असल्याने येत्या काळात सतत खोदकामांना आळा बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच फिफा निमित्ताने जरी मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली असली, तरीही इतरही कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होणार नाही याची हमी देखील डगावकर यांनी दिली.