शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

एपीएमसीमध्ये डॉक्टर भरतीचा घाट; कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 1:48 AM

प्रशासनाकडे आरोग्यविषयी धोरणच नाही; संघटनांचा विरोध

- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने घनकचरा व्यवस्थापनासाठी आरोग्य अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी गरज नसताना दोन डॉक्टर नियुक्त करण्यात आले असून, त्यांचा काहीही उपयोग होत नाही. तिसºया डॉक्टरची नियुक्ती करून त्याच्यावर प्रतिमहिना ४५ हजार रुपये खर्च करण्यात येणार असून या विषयी कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.बाजार समितीचे कामकाज अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरू लागले आहे. देखभाल शाखेचा अनागोंदी कारभार, रखडलेले प्रकल्प, भाजी व फळ मार्केटची झालेली धर्मशाळा यामुळे प्रशासनावर टीका होऊ लागली आहे. यापूर्वी प्रशासनाने पाच मार्केटसाठी तात्पुरत्या स्वरूपात पोलीस किंवा सैन्य दलातील माजी अधिकाºयांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला कर्मचारी संघटनेने न्यायालयात हरकत घेतल्यानंतर तो प्रस्ताव बारगळला होता. यानंतर प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी आरोग्य अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. एमबीबीएस किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील किंवा औद्योगिक क्षेत्रामधील नामांकित कंपनीमध्ये आरोग्य अधिकारी पदावर काम केल्याचा पाच वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाºयाला ४० हजार रुपये पगार, पाच हजार रुपये वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे. २८ आॅगस्टपर्यंत या पदासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. या भरतीला कर्मचाºयांकडून विरोध होऊ लागला आहे. राजकीय वशिल्यामुळे कोणाची तरी सोय करण्यासाठी हा निर्णय घेतला जात असून, त्यामुळे एपीएमसीचा काहीही फायदा होणार नसल्याचे बोलले जात आहे.बाजार समितीमध्ये यापूर्वीही दोन डॉक्टर कार्यरत आहेत. यामधील अजय पाटील हे वैद्यकीय अधिकारी असून, २००८ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एपीएमसीचे कर्मचारी व माथाडींवर उपचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे; परंतु त्यांना फारसे काम नसते. डॉक्टरची काहीही गरज नसताना २०१६ मध्ये दीपाली लुंगारे यांची सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन डॉक्टर बाजार समितीमध्ये आहेत; परंतु त्याचा काहीही उपयोग एपीएमसीमधील कर्मचारी, व्यापारी व कामगारांना होत नाही. मार्केटमध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून कधीच शिबिराचे आयोजन केले जात नाही. वैद्यकीय सुविधेचा मार्केटमधील विविध घटकांना लाभ व्हावा, यासाठी जनजागृतीही केली जात नाही.डॉक्टर असून नसल्यासारखे असून त्यांच्या वेतनासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. पूर्वीच्याच डॉक्टरांचा भार प्रशासनाला सहन करावा लागत असताना नवीन डॉक्टर भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे अनेक कर्मचाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.कर्मचारी संघटना विरोध करणारबाजार समितीमधील आरोग्य अधिकारी भरती करण्याच्या निर्णयाला बहुतांश सर्वच कामगार संघटनांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दोन डॉक्टर कार्यरत असून त्यांचा फारसा उपयोग होत नाही. अशा स्थितीमध्ये नवीन डॉक्टरची भरती करून महिन्याला ४५ हजार रूपयांचा भुर्दंड लादू नये, अशी भूमिका घेतली आहे. याविषयी लवकरच प्रशासनाला पत्र देण्यात येणार आहे.किती जणांवर उपचारबाजार समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी दहा वर्षांपासून कार्यरत असून, दोन सहायक आरोग्य अधिकारी पदेही भरण्यात आली आहेत. या दोन्ही डॉक्टरांची नियुक्ती झाल्यापासून त्यांच्यावर किती खर्च झाला व किती रूग्णांवर उपचार करण्यात आला, याचा अहवाल सादर करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. माहिती अधिकारामध्येही त्या विषयी माहिती मागविण्याच्या हालचाली सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केल्या आहेत.डॉक्टरांची माहिती नाहीबाजार समितीमध्ये दोन डॉक्टर आहेत. त्याविषयी पुरेशी माहिती मार्केटमधील माथाडी कामगार, व्यापारी, वाहतूकदार व इतर घटकांना नाही. नक्की कोणावर उपचार केले जाणार, या विषयी भूमिका स्पष्ट नाही. पाच मार्केटमधील विविध घटकांना याची माहितीच नाही. अशा स्थितीमध्ये आरोग्य अधिकाºयाच्या नावाने तिसºया डॉक्टराची नियुक्ती करू नये, अशी मागणी केली आहे.घनकचरा व्यवस्थापनासाठी निर्णयबाजार समिती प्रशासनाशी या विषयी चर्चा केली असता, पाचही मार्केटमधील घनकचरा व्यवस्थापनास शिस्त लावावी, साफसफाई वेळेवर करण्यात यावी.भविष्यातील वीज प्रकल्पावर देखरेख करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनासाठी आरोग्य अधिकारी नियुक्त करणे आवश्यक असून त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई