डॉक्टरला मारहाण
By admin | Published: November 21, 2015 01:03 AM2015-11-21T01:03:03+5:302015-11-21T01:03:03+5:30
किरकोळ वादातून डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री नेरूळ येथे घडली आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयात घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली.
नवी मुंबई : किरकोळ वादातून डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री नेरूळ येथे घडली आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयात घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.
छातीत दुखत असल्याने शिरवणे गाव येथील एका व्यक्तीला नेरुळच्या डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिथल्या डॉक्टरांनी रुग्णाची सोनोग्राफी करून घेण्याचे नातेवाइकांना कळवले होते. मात्र नातेवाइकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर काही वेळाने त्याठिकाणी आलेल्या डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांकडे यासंबंधीचा जाब विचारला. त्यामुळे जमलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी सर्व जबाबदारी डॉक्टरांवर ढकलत वाद घातला. रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉ. रजत खांडेलवाल यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. त्यामुळे डी.वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार नेरूळ पोलिसांकडे केली होती. यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केली. (प्रतिनिधी)