शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

डॉक्टरला मारहाण

By admin | Published: November 21, 2015 1:03 AM

किरकोळ वादातून डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री नेरूळ येथे घडली आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयात घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली.

नवी मुंबई : किरकोळ वादातून डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री नेरूळ येथे घडली आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयात घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.छातीत दुखत असल्याने शिरवणे गाव येथील एका व्यक्तीला नेरुळच्या डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिथल्या डॉक्टरांनी रुग्णाची सोनोग्राफी करून घेण्याचे नातेवाइकांना कळवले होते. मात्र नातेवाइकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर काही वेळाने त्याठिकाणी आलेल्या डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांकडे यासंबंधीचा जाब विचारला. त्यामुळे जमलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी सर्व जबाबदारी डॉक्टरांवर ढकलत वाद घातला. रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉ. रजत खांडेलवाल यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. त्यामुळे डी.वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार नेरूळ पोलिसांकडे केली होती. यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केली. (प्रतिनिधी)