शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

डॉक्टर्सही सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला, औषधविक्रेत्यांचाही सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 3:26 AM

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्याकडून पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरे भरवून मोफत औषध उपचार केले जाणार आहेत. त्यानुसार औषध विक्रेत्यांनीही अत्यावश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून दिला आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा परिसराला बसलेल्या पुराच्या फटक्याने अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. तर काही गावांमध्ये अद्यापही बचावकार्य सुरूच आहे. पुराने वेढलेल्या सर्वच गावांचा पूर्णपणे संपर्क तुटल्याने त्या ठिकाणी आवश्यक सुविधाही पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. तर ज्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, त्यांच्या मदतीसाठी सर्वच स्तरातून हात पुढे येत आहेत. त्यानुसार नवी मुंबईतीलही पूरग्रस्त भागात मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये डॉक्टरांसह औषधविक्रेत्यांच्या विविध संघटनांचा सहभाग असल्याचे प्रभात ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रशांत थोरात यांनी सांगितले. पूरग्रस्त भागात सेवा देण्यास तयार असलेल्या डॉक्टरांची विविध पथके तयार करून सांगलीतील आळसंद येथे त्यांचा बेसकॅम्प तयार केला जाणार आहे.त्या ठिकाणावरून १५ ते १८ आॅगस्ट दरम्यान दररोज लगतच्या पलुस, वाळवा, इस्लामपूर तसेच इतर अनेक गावांमध्ये शिबिर भरवून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचेही डॉ. थोरात यांनी सांगितले. तर यामध्ये स्वयंसेवक म्हणूनही सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.त्याचप्रमाणे प्राणा फाउंडेशन व रोटरी क्लबच्या माध्यमातूनही नवी मुंबईतील तसेच सातारा येथील डॉक्टरांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी काही पथके सोमवारी सांगलीला रवाना होणार असल्याचे प्राणा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूरग्रस्त भागाचा आढावा घेऊन आवश्यक असलेल्या गावांमध्ये वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत. अशा २४ गावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राणा फाउंडेशनकडे सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये विस्थापितांची सोय करण्यात आलेल्या ठिकाणांचाही समावेश आहे. पुढील काही दिवसांत त्या ठिकाणी आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुरातून बचावलेल्या नागरिकांना साथीचे आजार होऊ नयेत याकरिता त्यांच्यावर औषधोपचार केले जाणार आहेत. त्याकरिता मोठ्या प्रमाणात औषधांचा साठाही करण्यात आला असून, काही साठा पूरग्रस्त भागात पाठवण्यात आल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले. तर आवश्यकता भासल्यास इतरही डॉक्टरांचे पथक पूरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंसह वैद्यकीय सुविधा पुरवण्यात नवी मुंबईकरांचा उत्साही सहभाग दिसून येत आहे.शहरातून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूचराज्यातील कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना विविध स्तरातून मदतकार्य पोहचविले जात आहे. नवी मुंबई शहरातून विविध संघटना पुढे सरसावल्या आहेत. रविवारच्या दिवशी मदतकार्याला विशेष जोर आल्याचे दिसून आले. विविध संघटना, राजकीय पक्षांचे नेते तसेच शैक्षणिक संस्थांनी मदत फेरी काढून अत्यावश्यक वस्तूंचे संकलन केले.पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यानुसार ऐरोलीतील ज्येष्ठ नगरसेवक एम. के. मढवी यांनी शनिवारी १00 पोती तांदूळ, एक टेम्पो सीलबंद पाण्याच्या बाटल्या आणि कपडे आदी साहित्य मुंबईतील शिवसेना भवनमध्ये जमा केले आहे.या वेळी शिवसेना महिला उपजिल्हा संघटक आणि नगरसेविका विनया मढवी, नगरसेवक करण मढवी यांच्यासह ऐरोली परिसरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सण-उत्सवांवरही पुराच्या दु:खाचे सावटपश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराच्या संकटामुळे शहरातील गणेशोत्सव, दहीहंडी मंडळांनी खर्चाला आवर घालण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी ईदचा खर्चही पूरग्रस्तांना मदत स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगली परिसरात आलेला पूर आठ दिवसानंतरही ओसरलेला नाही. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली असून, अद्यापही काही गावांमध्ये बचावकार्य सुरूच आहे.पुराचा फटका बसल्याने उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना पुन्हा धाडसाने उभे राहावे लागणार आहे, त्याकरिता आवश्यक असलेली इत्थंभूत प्रकारची मदत राज्यभरातील जनतेकडून मिळत आहे. त्यामध्ये गणेशोत्सव मंडळांसह दहीहंडी आयोजकांनीही सहभाग घेत, उत्सवावरील खर्चाला आवर घालून पूरग्रस्तांना मदतीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विरोधी पक्षनेते तसेच वडार समाज विकास समितीचे राष्टÑीय अध्यक्ष विजय चौगुले यांनी त्यांच्या वतीने होणाºया दहीहंडीच्या बक्षिसाची रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.घणसोलीतील शिवसाई गणेशोत्सव मंडळाकडून यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने केला जाणार आहे. तर गणेशाच्या आगमन व विसर्जनावर होणारा खर्च पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना देण्याचा निर्णय झाल्याचे मंडळाचे संस्थापक कृष्णा पाटील यांनी सांगितले. त्याशिवाय नागरिकांकडून मदत स्वरूपात मिळणारे साहित्य जमा करून पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याचेही कार्य मंडळाकडून सुरू आहे.त्याचप्रमाणे सोमवारी साजरी होणाºया ईदचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय सीवूडचे रहिवासी आमीन बागवान यांनी घेतला आहे. ईदच्या दिवशी बकरा खरेदी करण्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. अनेकदा काही बकरे लाखोच्या भावालाही विकले जातात. त्यानुसार बकरा खरेदी रद्द करून त्यासाठी होणारा खर्च पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतल्याचे बागवान यांनी सांगितले.पश्चिम महाराष्टÑाला पुराचा फटका बसल्यापासून विविध संघटनांकडून नागरिकांना मदतीचे आवाहन केले जात आहे. त्यानुसार मनसेकडूनही प्रत्येक शाखेत मदत संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. हे साहित्य कोल्हापूर व सांगली परिसरात पोहोचवले जाणार असल्याचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरNavi Mumbaiनवी मुंबई