श्वान नियंत्रण केंद्र रखडले
By Admin | Published: August 29, 2015 10:26 PM2015-08-29T22:26:09+5:302015-08-29T22:26:09+5:30
सानपाडा येथील प्रस्तावित श्वान नियंत्रण केंद्रास विरोध झाल्यामुळे सदर प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. पालिकेने सिडकोकडे नवी भूखंडाची मागणी केली असून अजून काही वर्षे
नवी मुंबई : सानपाडा येथील प्रस्तावित श्वान नियंत्रण केंद्रास विरोध झाल्यामुळे सदर प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. पालिकेने सिडकोकडे नवी भूखंडाची मागणी केली असून अजून काही वर्षे हे काम रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. रोज १५ ते २० नागरिकांना श्वानदंश होत आहे. शहरात पशु रूग्णालय व श्वान नियंत्रण केंद्र उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. पूर्वी पामबीच रोडवरील कोपरी येथे सदर केंद्र होते. ती वास्तू धोकादायक झाल्यामुळे सद्यस्थितीत क्षेपणभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात केंद्र उभारण्यात आले आहे. सिडकोने २०१२मध्ये सानपाडा मध्ये भूखंड दिला होता. परंतु सदर ठिकाणी केंद्र उभारण्यास विरोध झाल्यामुळे सदर प्रस्ताव जुलै २०१४ ला रद्द करण्यात आला. आता पुन्हा सिडकोकडे भूखंडाची मागणी केली असून भूखंड प्राप्त झाल्यानंतर नवीन केंद्राचे काम सुरू होणार आहे.
विस्तीर्ण भूखंड हवा
श्वान नियंत्रणांचे काम प्रभावीपणे करण्यासाठी १५०० चौ. मिटरचा भूखंड पालिकेला हवा आहे. या पूर्वी तुर्भे उड्डाणपूलाखाली व सानपाड्यातील केंद्राला विरोध झाल्यामुळे मानवी वस्तीपासून दूर अंतरावर भूखंडाचा शोध सुरू आहे.