वाशीच्या खाडीत डॉल्फीनचं दर्शन; खाडी किनाऱ्यावर नवी मुंबईकरांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 05:18 PM2022-02-12T17:18:21+5:302022-02-12T17:18:51+5:30
वाशी ते मानखुर्द खाडीदरम्यान रेल्वे पुलाजवळ दिसला डॉल्फिन
वाशीच्या खाडीमध्ये आज डॉल्फिन मासा पहायला मिळाला. मासेमारी करणाऱ्या तरुणानं पाण्यामधून बाहेर उडी मारणाऱ्या डॉल्फिन माश्याचं हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं आहे. मागील वर्षीदेखील नवी मुंबईत डॉल्फिन पाहायला मिळाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता नवी मुंबईकर डॉल्फिनला पाहण्यासाठी खाडी किनारी गर्दी करताना दिसत आहेत.
वाशी खाडीत दिसला डॉल्फिन; मासेमारी करणाऱ्या तरुणाकडून दृश्य मोबाइलमध्ये कैद; डॉल्फिन पाहण्यासाठी खाडी किनारी नवी मुंबईकरांची गर्दी https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/zeiO87Anj6
— Lokmat (@lokmat) February 12, 2022
वाशी ते मानखुर्द खाडीदरम्यान रेल्वे पुलाजवळ हा डॉल्फिन दिसून आला. नेमक्या याच वेळेत वाशी गावातील काही मच्छीमार या परिसरात मासेमारी करीत होते. त्यातील लक्ष्मण भोईर यांनी त्याचे चित्रीकरण केले.