उरण : आजपर्यंत शासनाने विविध कर आणि वाहतुकीचे विविध नियम मोडल्याबद्दल हजारो वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल केला आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून वाहतूककोंडी आणि खड्डेमय रस्त्यांपासून नागरिकांची अद्यापही सुटका झालेली नाही. त्यामुळे आता उरणकर यापुढे वाहतुकीचे कोणतेही नियम पाळणार नाहीत, दंडही भरणार नाहीत. त्यामुळे आता नागरिकांच्या जीवाची पर्वा करणे, ट्रॅफिक पोलिसांनी सोडून द्यावे.त्या शिवाय शासनाला कोणत्याही प्रकारचा करही भरणार नाहीत. जेव्हा उरणमधून पैसे गोळा होणार नाहीत, तेव्हाच आपल्या समस्या सोडवल्या जातील आणि सरकारला जाग येईल. उरणकरांना आवाहन करणाऱ्या समाजमाध्यमांवर पाठविण्यात आलेल्या मेसेजमुळे शासकीय अधिकारी आणि वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. उरण-पनवेल, उरण-बेलापूर मार्गावरील आणि उरण-जेएनपीटी परिसरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे.उन्हाळा असो की पावसाळा, उरणकरांना मागील अनेक वर्षांपासून वाढत्या अवजड वाहनांच्या रहदारीमुळे होणाºया प्रचंड वाहतूककोंडीचा समाना करावा लागत आहे, अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विविध छोट्या-मोठ्या अपघातांमुळे मागील सात-आठ वर्षांत सुमारे ८५० हून अधिक निष्पाप नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रस्त्यांवरील विविध अपघातांमुळे हजारो तरुणांचा मृत्यू होत आहे. कुणाचा भाऊ, तर कुणाचा बाप, तर कुणाची आई, तर कुणाच्या आईवडिलांचा एकुलता एक कमावता मुलगा अपघात दगावला. ज्यांचा मुलगा रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामुळे दगावला आहे, असे आईबाप कसे जगतात, याचा शासनाने विचार केलाय का कधी? असा प्रश्न समाजमाध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.याला कारणीभूत ठरत आहेत खराब रस्ते, रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, रस्त्यावरील अतिक्रमण करीत उभी ठेवण्यात येत असलेली अवजड वाहने, रस्त्यांवरील अंधार, रस्त्यांवर पडून साचलेला दगड-मातीचा कचरा, खोदलेले रस्ते वेळीच बनवले नाहीत, खड्ड्यात पाणी साचून राहते.>नागरिकांच्या भल्यासाठी हा मेसेज प्रत्येक उरणकरापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.शासकीय अधिकारी आणि वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांमध्ये खळबळ माजली आहे.नागरिकांच्या भल्यासाठी हा मेसेज प्रत्येक उरणकरापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
उरणकरांनो, वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:49 PM