महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे डीपी नादुरुस्त : घारापुरी बेटावरची बत्ती गुल  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 09:44 PM2023-07-04T21:44:45+5:302023-07-04T21:45:00+5:30

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनी मिळालेल्या कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला ग्रहण लागले आहे.

DP damaged due to inexcusable neglect of Mahavitran: Gharapuri Island Batti Gul | महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे डीपी नादुरुस्त : घारापुरी बेटावरची बत्ती गुल  

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे डीपी नादुरुस्त : घारापुरी बेटावरची बत्ती गुल  

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनी मिळालेल्या कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला ग्रहण लागले आहे. याआधीच पाच पैकी तीन फेज नादुरुस्त झाल्याने बेटवासियांवर अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली होती.तीन फेजच्या वीजपुरवठ्याअभावी पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप बंद पडल्याने तीनही गावातील नागरिकांना होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासूनच ठप्प झाल्याने  बेटवासिय आणि पर्यटकांच्या नशिबी विहिरी, पावसाळ्यातील पागोळीचे पाणी पिण्याची पाळी आली असतानाच बेटावरील वीजपुरवठा करणारा डीपीच शुक्रवारी  नादुरुस्त झाल्याने जागतिक कीर्तीचे बेटावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

 बेटवासियांना कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यासाठी २० कोटी रुपये खर्चून समुद्रातून न्युट्लसह टाकण्यात आलेल्या उच्च दाबाच्या पाचही वीज वाहिन्यांचे काम तांत्रिकदृष्ट्या सदोषच झाले आहे.उद्घाटनासाठी गावागावात घाईघाईत टाकलेल्या अंतर्गत केबल्स जमिनीवर टाकण्यात आल्याने वारंवार दोष निर्माण होत आहे.समुद्रातुन टाकण्यात आलेल्या मोराबंदर गावातील मुख्य केबल वाहिन्यांच्या डीपीमध्ये सुरुवातीपासूनच वारंवार बिघाड उद्भवत असल्याने बेटावरील वीज वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.या ठिकाणी होणाऱ्या वारंवार बिघाडावर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास भविष्यात सबमरिन केबललाच फटका बसण्याची भीतीही तत्कालीन सरपंच बळीराम ठाकूर यांनी २०२० मध्येच पत्राद्वारे व्यक्त केली होती.मात्र या गंभीर तक्रारींकडे
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.


महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मात्र बेटावासियांवर मागील आठवड्यापासूनच अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली होती.बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या समुद्राखालील उच्च दाबाच्या पाच विद्युत वाहिन्यांपैकी एक केबल २१ मे २०२२ रोजी नादुरुस्त होऊन निकामी झाली आहे.चारपैकी एक विद्युत केबल १५ जुन २०२३ रोजी निकामी, नादुरुस्त झाली आहे.त्यामुळे सध्या बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर,या तीनही गावांना दोन फेजवरुनच वीजपुरवठा केला जात होता.

बेटवासियांना पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपांना थ्रीफेज वीजेचा तुटवडा भासत असल्याने ग्रामपंचायत करीत असलेल्या तीनही गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने  बेटवासियांना आता पिण्यासाठी आणि पर्यटकांच्या नशिबी विहिरी, पावसाळ्यातील पागोळीचे पाणी पिण्याची पाळी आली होती.या संकटांचा सामना करीत असतानाच बेटावरील राजबंदर गावाला वीजपुरवठा करणारा डीपीच शुक्रवारी (३०) संध्याकाळी नादुरुस्त झाल्याने जागतिक कीर्तीचे बेटावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

घारापुरी बेटावर वीज पुरवठा करणाऱ्या समुद्राखालील नादुरुस्त झालेल्या केबल्सचा शोध खासगी ड्रायव्हर्स मार्फत मागील आठ दिवसांपासून घेतला जात आहे.समुद्राखालील तांत्रिक बिघाडाचाही शोध घेण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या केबल्सची दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत.मात्र किती कालावधी लागेल हे निश्चितपणे सांगता येत नाही.शुक्रवारी (३०) बेटावरील डीपी अतिरिक्त लोड आल्याने अचानक नादूरुस्त झाला आहे. जाग्यावरच डीपी दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था : वीज पुरवठा तुर्तास पुर्ववत

राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तीनही गावातील बेटवासियांना पाणी पुरवठा करण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने इंधनावर चालणाऱ्या जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे बेटवासियांचा पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.बेटावरील राजबंदर येथील नादुरुस्त डीपीच्या दूरुस्तीचे काम मंगळवारी (४) संध्याकाळी पाचनंतर पुर्ण झाले आहे.त्यामुळे राजबंदरसह तीनही गावातील दोन फेजवरुनच तुर्तास वीजपुरवठा सुरू झाला आहे.मात्र समुद्रातील केबल्स दूरुस्तीखेरीज बेटावरील वीजेची समस्या दूर होणार नसल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

Web Title: DP damaged due to inexcusable neglect of Mahavitran: Gharapuri Island Batti Gul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.