शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे डीपी नादुरुस्त : घारापुरी बेटावरची बत्ती गुल  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 9:44 PM

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनी मिळालेल्या कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला ग्रहण लागले आहे.

मधुकर ठाकूर

उरण : महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनी मिळालेल्या कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला ग्रहण लागले आहे. याआधीच पाच पैकी तीन फेज नादुरुस्त झाल्याने बेटवासियांवर अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली होती.तीन फेजच्या वीजपुरवठ्याअभावी पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप बंद पडल्याने तीनही गावातील नागरिकांना होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासूनच ठप्प झाल्याने  बेटवासिय आणि पर्यटकांच्या नशिबी विहिरी, पावसाळ्यातील पागोळीचे पाणी पिण्याची पाळी आली असतानाच बेटावरील वीजपुरवठा करणारा डीपीच शुक्रवारी  नादुरुस्त झाल्याने जागतिक कीर्तीचे बेटावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

 बेटवासियांना कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यासाठी २० कोटी रुपये खर्चून समुद्रातून न्युट्लसह टाकण्यात आलेल्या उच्च दाबाच्या पाचही वीज वाहिन्यांचे काम तांत्रिकदृष्ट्या सदोषच झाले आहे.उद्घाटनासाठी गावागावात घाईघाईत टाकलेल्या अंतर्गत केबल्स जमिनीवर टाकण्यात आल्याने वारंवार दोष निर्माण होत आहे.समुद्रातुन टाकण्यात आलेल्या मोराबंदर गावातील मुख्य केबल वाहिन्यांच्या डीपीमध्ये सुरुवातीपासूनच वारंवार बिघाड उद्भवत असल्याने बेटावरील वीज वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.या ठिकाणी होणाऱ्या वारंवार बिघाडावर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास भविष्यात सबमरिन केबललाच फटका बसण्याची भीतीही तत्कालीन सरपंच बळीराम ठाकूर यांनी २०२० मध्येच पत्राद्वारे व्यक्त केली होती.मात्र या गंभीर तक्रारींकडेमहावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मात्र बेटावासियांवर मागील आठवड्यापासूनच अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली होती.बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या समुद्राखालील उच्च दाबाच्या पाच विद्युत वाहिन्यांपैकी एक केबल २१ मे २०२२ रोजी नादुरुस्त होऊन निकामी झाली आहे.चारपैकी एक विद्युत केबल १५ जुन २०२३ रोजी निकामी, नादुरुस्त झाली आहे.त्यामुळे सध्या बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर,या तीनही गावांना दोन फेजवरुनच वीजपुरवठा केला जात होता.

बेटवासियांना पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपांना थ्रीफेज वीजेचा तुटवडा भासत असल्याने ग्रामपंचायत करीत असलेल्या तीनही गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने  बेटवासियांना आता पिण्यासाठी आणि पर्यटकांच्या नशिबी विहिरी, पावसाळ्यातील पागोळीचे पाणी पिण्याची पाळी आली होती.या संकटांचा सामना करीत असतानाच बेटावरील राजबंदर गावाला वीजपुरवठा करणारा डीपीच शुक्रवारी (३०) संध्याकाळी नादुरुस्त झाल्याने जागतिक कीर्तीचे बेटावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.घारापुरी बेटावर वीज पुरवठा करणाऱ्या समुद्राखालील नादुरुस्त झालेल्या केबल्सचा शोध खासगी ड्रायव्हर्स मार्फत मागील आठ दिवसांपासून घेतला जात आहे.समुद्राखालील तांत्रिक बिघाडाचाही शोध घेण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या केबल्सची दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत.मात्र किती कालावधी लागेल हे निश्चितपणे सांगता येत नाही.शुक्रवारी (३०) बेटावरील डीपी अतिरिक्त लोड आल्याने अचानक नादूरुस्त झाला आहे. जाग्यावरच डीपी दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था : वीज पुरवठा तुर्तास पुर्ववत

राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तीनही गावातील बेटवासियांना पाणी पुरवठा करण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने इंधनावर चालणाऱ्या जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे बेटवासियांचा पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.बेटावरील राजबंदर येथील नादुरुस्त डीपीच्या दूरुस्तीचे काम मंगळवारी (४) संध्याकाळी पाचनंतर पुर्ण झाले आहे.त्यामुळे राजबंदरसह तीनही गावातील दोन फेजवरुनच तुर्तास वीजपुरवठा सुरू झाला आहे.मात्र समुद्रातील केबल्स दूरुस्तीखेरीज बेटावरील वीजेची समस्या दूर होणार नसल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.