डॉ. आंबेडकर म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखी

By admin | Published: May 6, 2015 11:22 PM2015-05-06T23:22:53+5:302015-05-06T23:24:13+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात क्रांतीचे धगधगते ज्वालामुखी होते. त्यांनी बहिष्कृत जीणे जगणाऱ्यांसाठी लढा उभारला.

Dr. Ambedkar means the volcano of the revolution | डॉ. आंबेडकर म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखी

डॉ. आंबेडकर म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखी

Next

नागोठणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात क्रांतीचे धगधगते ज्वालामुखी होते. त्यांनी बहिष्कृत जीणे जगणाऱ्यांसाठी लढा उभारला. या लढ्याच्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार जिल्ह्यातील आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांनी केला. शेतकऱ्यांचा संप, खोतशाही नष्ट करण्यात डॉ. आंबेडकरांचे योगदान असून सालिंदे गावात आगरी आणि बौद्धबांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत, हे त्याचेच प्रतीक असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
बुद्ध जयंतीचे औचित्य साधून आनंदराज आंबेडकर यांनी सालिंदे (कासू) येथील बुद्धविहारला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते. डॉ. आंबेडकर आणि भगवान बुद्ध समतेचे प्रतीक आहेत. बुद्धांचे धम्म तत्त्वज्ञान आणि चांगुलपणाच्या नीतीने परिपूर्ण असा भरलेला आहे, म्हणूनच धम्म सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी असाच आहे. धम्माचा आरंभ, मध्य आणि शेवट कल्याणकारीच आहे.
कल्याणाचा विचार जनसामान्यांना पोहोचविण्याचा संदेश आपल्याला भगवान बुद्ध यांनीच दिला असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती, मुंबईचे सरचिटणीस लक्ष्मण भगत, निवृत्त पोलीस अधिकारी प्रमोद काकडे, बौद्धजन समाज सेवा संघ, रायगडचे सचिव चंद्रकांत अडसुळे, पांडुरंग साळवी, दयानंद काकडे आदी मान्यवरांसह समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Dr. Ambedkar means the volcano of the revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.