शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

डॉ. आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल आच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 2:43 AM

ऐरोली सेक्टर-१५मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास मार्बल आच्छादन लावण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर मार्बल लावण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-१५मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास मार्बल आच्छादन लावण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर मार्बल लावण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. १३ कोटी चार लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अंतर्गत सजावटीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला असून, दहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.महानगरपालिकेने ऐरोलीमध्ये उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल आच्छादन लावण्याचा प्रस्ताव २०१६मध्ये सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता; पण तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डोमला मार्बल लावण्याचा प्रस्ताव रद्द करून सफेद रंग लावण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी आंदोलन करून मार्बलच बसविण्यात यावे, असा आग्रह धरला होता. मुंढे यांची बदली झाल्यानंतर विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनी लोकआग्रहास्तव मार्बल लावण्याचा निर्णय घेऊन निविदा प्रक्र्रिया सुरू केली होती. मंगळवारी या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली. या स्मारकाची भव्यता लक्षात घेता, दिल्लीतील लोटस टेंपलप्रमाणे मार्बल लावण्यात येणार असून, अंबाजी मार्बलची निवड करण्यात आली आहे. १३ कोटी चार लाख ७८ हजार ४०० रुपयांना हे काम अश्विनी इन्फ्राडेव्हलपमेंट कंपनीला देण्यात आले आहे. एका वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. स्थायी समितीने गतआठवड्यात स्मारकाच्या अंतर्गत सजावटीच्या प्रस्तावासही मंजुरी दिली आहे. स्मारकामधील फ्लोरिंगमध्ये किरकोळ बदल करणे, फर्निचर व इतर कामे करण्यासाठीचा ठेका श्रीस्टी इंटरप्रायझेस कंपनीला देण्यात आला आहे. यासाठी १० कोटी ३३ लाख रुपये खर्च येणार आहे. एका वर्षामध्ये अंतर्गत सजावटीचे कामही पूर्ण केले जाणार आहे. मार्बल व अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण झाल्यानंतर स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे. दोन्ही कामे वेळेत पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे.>ठेकेदाराच्या पात्रतेविषयी शंकाअश्विनी इन्फ्राडेव्हलपमेंट या ठेकेदाराने अंतर्गत सजावटीचा ठेका घेण्यासाठी निविदा सादर केली होती; पण त्यांना तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरवले होते. श्रीस्टी या ठेकेदाराला अंतर्गत सजावटीचे काम दिले; पण डोमचे काम अश्विनीला देण्यात आले आहे. यावर पुन्हा सदस्यांनी आक्षेप घेतला. दोन वेगवेगळे ठेकेदार एकाच कालावधीत काम कसे पूर्ण करणार? असा प्रश्नही उपस्थित केला.