महापौरपदासाठी डॉ. कविता चौतमल यांचे नाव चर्चेत
By admin | Published: May 22, 2017 02:24 AM2017-05-22T02:24:49+5:302017-05-22T02:24:49+5:30
महापालिकेचा पहिला महापौर होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. महापौरपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असल्यामुळे
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : महापालिकेचा पहिला महापौर होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. महापौरपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असल्यामुळे अनेक दिग्गज या स्पर्धेतून बाद झाले. महापौरपदावर डोळा ठेवून
अनेक जण भाजपात आले असले, तरी आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपा युवामोर्चाचे जिल्हा सरचिटणीस
किशोर चौतमल यांच्या पत्नीचे नाव चर्चेत
आहे. प्रभाग १४ मधून त्या निवडणूक लढवित आहेत.
महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी आणि आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा, यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, आरक्षण सोडतीत महापौरपद अनुसूचित जाती महिलापदासाठी राखीव झाल्यामुळे, पहिला महापौर होण्याची इथल्या पारंपरिक नेत्यांची स्वप्ने धुळीस मिळाली. त्यामुळे सगळ्या पक्षांकडून कार्यक्षम, सुशिक्षित अनुसूचित महिलेचा शोध सुरू झाला.
भाजपाने प्रभाग १६मधून डॉ. कविता चौतमल यांचे नाव पुढे केले आहे. नवीन पनवेलमधील या भागाने मागील दहा वर्षे प्रशांत ठाकूर यांच्या बाजूने कौल दिल्यामुळे त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे.