सचिन धर्माधिकारींना डी-लीट ही पदवी देऊन या पदवीचाच सन्मान झाला; एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 10:07 PM2023-03-05T22:07:30+5:302023-03-05T22:10:02+5:30

डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचा डी-लीट पदवी प्रदान सोहळा आज नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Dr. Sachin Dharmadhikari was honored with the title of D-Leet; CM Eknath Shinde praised | सचिन धर्माधिकारींना डी-लीट ही पदवी देऊन या पदवीचाच सन्मान झाला; एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक

सचिन धर्माधिकारींना डी-लीट ही पदवी देऊन या पदवीचाच सन्मान झाला; एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक

googlenewsNext

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ निरूपणकार सद्गुरू डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचा डी-लीट पदवी प्रदान सोहळा आज नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. 

आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम सदस्यांच्या माध्यमातून राबविण्यात येतात. जिथे सरकार पोहचू शकत नाही तिथे सदस्यांच्या माध्यमातून सेवा पोहोचवण्यात येते असेही यासमयी बोलताना नमूद केले. सर्वसामान्य माणूस सुखी आणि समाधानी रहावा यासाठी हे महान कार्य अविरतपणे सुरू असून खऱ्या अर्थाने माणूस घडवणारे विद्यापीठ जर या राज्यात कुठे असेल तर ते रेवदंडा येथे आहे, असे कौतुक एकनाथ शिंदेंनी यावेळी केले. 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करताना सचिन दादा धर्माधिकारी यांनीही हा वसा अंगिकारला आहे. त्यांनी जनसेवा, आरोग्यसेवा, स्वच्छता, व्यसनमुक्ती व स्वयंरोजगार या पंचसूत्रीला अनुसरून आपले जनसेवेचे कार्य अखंड सुरू ठेवले आहे. आज या मार्गावर त्यांच्यासह लाखो अनुयायी देखील मार्गक्रमण करत असून त्याबद्दल त्यांना डी-लीट ही पदवी देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना ही पदवी बहाल करून या पदवीचाच बहुमान झाला असल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, या सोहळ्याला याप्रसंगी तीर्थस्वरूप सद्गुरू आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन दादा धर्माधिकारी, केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार पूनम महाजन, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर तसेच सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Dr. Sachin Dharmadhikari was honored with the title of D-Leet; CM Eknath Shinde praised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.