उरण : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि न्हावा- शेवा वाहतूक शाखेतर्फे 'रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम ' या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.
देशभरात राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे.याच पाश्वभुमीवर जनजागृती मोहीमे अंतर्गत नवीमुंबई पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली न्हावा- शेवा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम.मुजावर यांच्या नेतृत्वाखाली विविध शाळांमध्ये 'रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम ' या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या आयोजित चित्रकला स्पर्धेत मोरु नारायण म्हात्रे, खारकोपर, उलवे येथील विविध विद्यालय,शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये छोटा पोलीस मास्करेड चा वापर करून वाहतूक नियमांबाबत जनजागृतीही करण्यात आली.
या जनजागृती मोहीमेत पोलीस शिपाई मयूर पाटील व मोरू नारायण म्हात्रे विद्यालयातील शिक्षक, कर्मचारीही सहभागी झाले होते.