शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

द्रोणागिरी नोड विकासाच्या टप्प्यात; सिडकोचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:56 PM

गृहप्रकल्पांसह पायाभूत सुविधांवर भर

नवी मुंबई : विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासावर सिडकोने आता आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील वर्षभरापासून या विभागात विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सिडकोने भर दिला आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या वर्षी जाहीर केलेल्या १५ हजार घरांच्या महाप्रकल्पातील अडीच हजार घरे द्रोणागिरीमध्ये उभारली जात आहेत. तसेच अलीकडेच जाहीर झालेल्या ९ हजार घरांच्या योजनेत द्रोणागिरी नोडमध्ये जवळपास दीड हजार घरे प्रस्तावित आहेत. त्यामुळे येत्या काळात द्रोणागिरीचा झपाट्याने विकास होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.द्रोणागिरी नोडची घोषणा केल्यानंतर सिडकोकडून या नोडच्या विकासासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. पायाभूत सुविधांच्या बाबतीत सुरुवातीपासून उदासीनता बाळगण्यात आली. त्यामुळे या नोडचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. याचा फटका येथील गुंतवणूकदार आणि विकासकांना बसला. जमिनींतील कोट्यवधींची गुंतवणूक अडकून पडली. पायाभूत सुविधाच नसल्याने मालमत्तेकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. याचा परिणाम म्हणून अनेक गृहप्रकल्प अर्धवट अवस्थेत बंद पडले. साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचेही नियोजन चुकले. वाटप करण्यात आलेल्या बहुतांशी भूखंडांचा खारफुटीच्या क्षेत्रात समावेश झाल्याने या भूखंडांच्या विकासालासुद्धा खोडा झाला. परिणामी, मागील १० वर्षांत द्रोणागिरीतील विकासकामे ठप्प पडली. परंतु सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे हाती घेताच लोकेश चंद्र यांनी द्रोणागिरी नोडच्या विकासावर आपले लक्ष केंद्रित केले.या विभागाचा दौरा करून रखडलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर या क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. इतकेच नव्हेतर, १५ हजार घरांच्या गृह योजनेतील जवळपास अडीच हजार घरे द्रोणागिरीमध्ये निर्माण करण्याचे ठरविले. त्यानुसार कार्यवाहीसुद्धा करण्यात आली. या घरांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील एक-दोन वर्षांत या घरांचा ताबासुद्धा दिला जाईल. आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या योजनेतील जवळपास दीड हजार घरे द्रोणागिरीमध्ये बांधली जाणार आहेत.

टॅग्स :cidcoसिडको