शहरं
Join us  
Trending Stories
1
पूजा दिलीप खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
2
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
3
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
4
Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...
5
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
6
Vidhan Sabha Election: करमाळा-माढा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली; कारण...
7
सध्या मराठा समाज कुणासोबत महाविकास आघाडी की महायुती? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं
8
Life lesson: हो! जीवंतपणी स्वर्ग आणि नरक पाहणे शक्य आहे; 'असा' घ्या अनुभव!
9
“सांगली पॅटर्न लोकप्रिय नाही, मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही अन्यथा...”: संजय राऊत
10
Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेआधी घरातून 'हे' फोटो आधी बाहेर काढा; होऊ शकते आर्थिक नुकसान!
11
प्रेग्नंन्ट आहे दिव्यांका त्रिपाठी, ३९व्या वर्षी होणार आई! दिवाळी पार्टीत फ्लॉन्ट केला बेबी बंप
12
"आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता...", अजित पवार यांचा शरद पवारांना टोला
13
Gold Price Outlook: पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं १ लाखांपार जाण्याची शक्यता; चांदीचीही चमक वाढणार
14
Ajit pawar: शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते"
15
दिवाळीतील गुरुवार: इच्छा आहे, पण स्वामी सेवा शक्य होत नाही? ‘अशी’ करा स्वामी समर्थ मानसपूजा
16
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
17
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
18
अखेर तो क्षण आलाच.... तब्बल २८ वर्षांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पुन्हा जुळून येणार योग
19
Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या

दिवाळीसाठी सुकामेवा प्रिय; बदाम, पिस्ता, अक्रोड स्वस्त; APMCमध्ये आवक वाढली

By नामदेव मोरे | Published: October 31, 2023 8:46 AM

काजू, अंजीर, मनुक्याचा भाव चढाच

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : दिवाळीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये सुकामेव्याची आवक वाढली आहे. काजू, अंजीर व मनुके वगळता इतर सुकामेव्याचे दर गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमी असल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. यावर्षीही मिठाईपेक्षा पौष्टिक सुकामेव्याला ग्राहकांची पसंती लाभू लागली आहे.

गणपती, दसऱ्यानंतर यावर्षी  दिवाळीही धूमधडाक्यात साजरी होणार आहे. दिवाळी काही दिवसांवर आल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये आवक वाढली आहे. सोमवारी मार्केटमध्ये वाहनांची संख्या वाढल्यामुळे चक्का जामची स्थिती निर्माण झाली होती. दिवसभरात जवळपास २०० टन सुकामेव्याची आवक झाली आहे.  कोरोनापासून नागरिकांना आरोग्याचे महत्त्व लक्षात आले आहे. गोड मिठाई मधुमेह, रक्तदाबासह इतर आजारांना आमंत्रण देत असल्यामुळे ग्राहकांकडून आता सुकामेव्याला पसंती दिली जात आहे. यावर्षी बाजारभावही नियंत्रणात असल्यामुळे ग्राहकांकडून खरेदीला पसंती मिळू लागली आहे.

सुकामेव्याचे तुलनात्मक दर

  • वस्तू    २०२२    २०२३ 
  • अंजीर    ६०० ते ८००    ८०० ते १३००
  • काजू    ५०० ते ६००    ४०० ते ८००
  • बदाम    ६०० ते ८००    ६५० ते ७५०
  • खजूर    ८० ते १५०    ८० ते १२०
  • खारीक    १४० ते २४०    १२० ते ३००
  • मनु    १२० ते २००    १५० ते २२०
  • पिस्ता    १००० ते १६००    ८६५ ते ११००
  • आक्रोड    १००० ते १५००    ५०० ते ९००

सर्वसामान्य ग्राहकांनी दिवाळीसाठी सुकामेवा खरेदीस सुरुवात केली नसली तरी मिठाई दुकानदार व इतर किरकोळ दुकानदारांची खरेदी सुरू झाली आहे. मसाला मार्केचे उपसचिव कैलास सावळकर यांनी सांगितले की, सोमवारपासून आवक वाढू लागली असून, पुढील ठवडा हंगाम राहील.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती