संरक्षण भिंत कोसळल्याने रबाळेत वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:14 AM2018-06-26T02:14:08+5:302018-06-26T02:14:11+5:30

रबाळे एमआयडीसी मार्गावरील बंजारा वाडी ते आंबेडकर नगर येथे सिमेन्स कंपनीच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. या कामाचा फटका शेजारून जाणाऱ्या सर्व्हिस रोडला बसला आहे

Due to the collapse of the protection wall, | संरक्षण भिंत कोसळल्याने रबाळेत वाहतूककोंडी

संरक्षण भिंत कोसळल्याने रबाळेत वाहतूककोंडी

Next

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी मार्गावरील बंजारा वाडी ते आंबेडकर नगर येथे सिमेन्स कंपनीच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. या कामाचा फटका शेजारून जाणाऱ्या सर्व्हिस रोडला बसला आहे. मुसळधार पावसात हा रस्ता अचानक खचल्याने या मार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली. दरम्यान, कामात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल महापालिकेने सिमेन्स कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सिमेन्स कंपनीच्या मागील बाजूस गेल्या अनेक दिवसांपासून रबाले आंबेडकर नगर रस्त्यालगत संरक्षण भिंतीचे काम सुरु आहे. या भिंतीलगत आरसीसी रिटेर्निंग वॉलचे बांधकाम सुरु होते. दरम्यान, दोन दिवसांपासून कोसळणाºया मुसळधार पावसामुळे बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले. त्याचा अतिरिक्त दाब निर्माण झाल्याने लगतचा रस्ता अचानक खचला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या घटनेचे वृत्त समजताच एमआयडीसीचे उपअभियंता यशवंत मेश्राम यांच्यासह महापालिकेचे घणसोली विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे, स्थापत्य विभागाचे उपअभियंता वसंत पडघम, कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे, जितेंद्र रावल, अतिक्रमण विभागाचे प्रमुख रोहित ठाकरे आदींनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. यावेळी सिमेन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी धिंडे हे सुध्दा उपस्थित होते. पाहणीनंतर रस्त्यावरील डेब्रिज बाजुला करून वाहतूक सुरू करण्यात आली. या कामासाठी तब्बल चार तासांचा कालावधी लागला. दरम्यान, विशेष म्हणजे याअगोदर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित ठेकेदाराला दोन वेळा नोटीस बजावली होती. त्यानंतरही भर पावसात काम सुरूच ठेवले होते. याची गंभीर दखल महापालिकेने घेतली असून असा प्रकार पुन्हा घडल्यास संबंधित कंपनीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Due to the collapse of the protection wall,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.