डेडलाइन अवघ्या काही तासांवर तरी उपाययोजनांची बोंब, वारंवार मुदतवाढ देऊनही पनवेल महापालिकेकडून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:49 AM2018-03-14T02:49:02+5:302018-03-14T02:49:02+5:30

महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील कचरा हस्तांतरणाचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. तीन वेळा कचरा हस्तांतरण स्वीकारण्यास महापालिकेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

Due to deadlines, only for a few hours, despite the delay, the Municipal Corporation has neglected the measures. | डेडलाइन अवघ्या काही तासांवर तरी उपाययोजनांची बोंब, वारंवार मुदतवाढ देऊनही पनवेल महापालिकेकडून दुर्लक्ष

डेडलाइन अवघ्या काही तासांवर तरी उपाययोजनांची बोंब, वारंवार मुदतवाढ देऊनही पनवेल महापालिकेकडून दुर्लक्ष

Next

वैभव गायकर 
पनवेल : महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील कचरा हस्तांतरणाचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. तीन वेळा कचरा हस्तांतरण स्वीकारण्यास महापालिकेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ मार्च ही अंतिम तारीख आहे. यानंतर सिडको नोडमधील कचरा उचलणार नसल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. यामुळे अवघे २४ तासांत पनवेल महापालिकेला कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.
पनवेल महापालिकेकडे कचरा हस्तांतरणासाठी सत्ताधारी आग्रही होते. मात्र प्रशासनामार्फत कचरा हस्तांरणाबाबत असमर्थता दर्शवल्याने सत्ताधारी विरुद्ध प्रशासन हा नवा वाद निर्माण झाला होता.
पनवेल महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभाग घेतला होता. शहरात सर्वेक्षण सुरू असताना सिडकोने कचरा उचलण्यास नकार दिल्याने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर सिडकोने १५ मार्च ही कचरा उचलण्यासाठी अंतिम तारीख निश्चित केली होती. आता एकच दिवस शिल्लक असताना कचरा हस्तांतरणाबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. महिनाभरापूर्वी सिडकोने कचरा व्यवस्थापनाचा भार उचलला म्हणून तब्बल ३ कोटी रुपयांचे बिल महापालिकेला पाठविले होते. या बिलाचा भरणा पालिकेने सिडकोला केला नसल्याने कचरा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. पनवेल महापालिका अखत्यारीत खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, तळोजा, कामोठे आदी सिडको नोडचा समावेश आहे.
पनवेल महापालिकेची स्थापना १ आॅक्टोबर २०१६ मध्ये झाली. महापालिकेच्या निवडणुका होऊनही जवळपास दीड-दोन वर्ष होत आहे. एवढ्या कालावधीत महापालिकेने कचरा प्रश्न हस्तांतरणासंदर्भात योग्य उपाययोजना करण्याची गरज होती. आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. अवघ्या २४ तासांत महापालिका कोणत्या उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. यासदंर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधला असता, १५ मार्चनंतर महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील कचरा आम्ही उचलणार नाही. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Due to deadlines, only for a few hours, despite the delay, the Municipal Corporation has neglected the measures.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.