साचलेल्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

By admin | Published: July 27, 2015 01:11 AM2015-07-27T01:11:57+5:302015-07-27T01:11:57+5:30

घोटसई ग्रामपंचायत हद्दीतील खिंडीतील दर्ग्याजवळच्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यात अंघोळीसाठी गेलेल्या टिटवाळा येथील

Due to the deterioration of water, the death of both | साचलेल्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

साचलेल्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

Next

टिटवाळा : घोटसई ग्रामपंचायत हद्दीतील खिंडीतील दर्ग्याजवळच्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यात अंघोळीसाठी गेलेल्या टिटवाळा येथील महागणपती हॉस्पिटल परिसरातील सलमान इक्बाल सय्य्द (२४) व शानू अजित नुरानी (२२) या दोन तरु णांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नुकतेच मीरा रोड व मुंब्रा येथून टिटवाळा येथील महागणपती हॉस्पिटल परिसरात आपल्या परिवारासह सलमान व शानू हे दोघे राहण्याकरिता आले होते.
इंदिरानगर येथील स्मशानभूमीजवळून घोटसई गावाकडे खिंडीतून रस्ता जातो. याच रस्त्यावर एक दर्गा आहे. या दर्ग्यात सलमान व शानू दोघे दुपारी ४ च्या सुमारास गेले होते. याच ठिकाणी असलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून तलाव तयार झाला आहे. यात सलमान व शानू अंघोळीसाठी उतरले. परंतु, पाणी खूपच खोल असल्याने व त्यांना पोहता येत नसल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
टिटवाळा पोलीस व कडोंमपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनाकरिता कल्याण येथील रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Due to the deterioration of water, the death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.