कोंडीमुळे म्हसळावासी हैराण

By admin | Published: January 2, 2017 03:54 AM2017-01-02T03:54:59+5:302017-01-02T03:54:59+5:30

श्री क्षेत्र हरिहरेश्वर व सुवर्ण गणेश मंदिर आणि पर्यटकांसाठी म्हसळा हा दुवा आहे. शहराची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे याठिकाणी वाहतूक

Due to a dilemma, the Mhaswala Haraan | कोंडीमुळे म्हसळावासी हैराण

कोंडीमुळे म्हसळावासी हैराण

Next

म्हसळा : श्री क्षेत्र हरिहरेश्वर व सुवर्ण गणेश मंदिर आणि पर्यटकांसाठी म्हसळा हा दुवा आहे. शहराची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
म्हसळ्यापासून अवघ्या २०-२२ किमी अंतरावर दिघी पोर्ट आहे. या पोर्टसाठी लागणारी जड-अवजड यंत्रसामग्री म्हसळ्यातूनच पुढे पोर्टकडे जाते व पोर्टमधून आलेला माल म्हसळ्यातूनच मुंबई-पुण्याकडे जातो. मार्गावरून सातत्याने ४० ते ४५ टनांच्या वाहनांची वाहतूक सुरू असते. अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. म्हसळ्याची बाजारपेठ मोठी असली तरी अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून परिणामी गर्दी वाढत आहे. याठिकाणी अनेकदा वाहतूक पोलीस बंदोबस्तावर नसल्याने हातगाडी, रिक्षा, मिनीडोर, दुचाकीस्वार बेफिकिरीने वाहने चालवतात. शिवाय रस्त्याच्या कडेला, बाजारपेठेतील दुकानांसमोर वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते.दिवेआगर, हरिहरेश्वर, मुरु ड, श्रीवर्धन ही पर्यटन स्थळे असल्यामुळे दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. एस.टी.च्या सुमारे दोनशे फेऱ्या दररोज होतात. याठिकाणी बायपास मार्ग असला तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. हा बायपास जर तोंडसुरेपासून पुढे जानसई निदवरु न सुरई आणि पुढे मुख्य रस्त्याला जोडला गेला असता तर ही कोंडीची समस्या उद्भवली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Due to a dilemma, the Mhaswala Haraan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.