शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

राज्यातील दुष्काळाचा शहरवासीयांना विसर, वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:03 AM

राज्यातील विविध जिल्हे आणि तालुके दुष्काळाने होरपळून निघाले आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे.

नवी मुंबई : राज्यातील विविध जिल्हे आणि तालुके दुष्काळाने होरपळून निघाले आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. मात्र मुबलक पाणीसाठा असलेल्या नवी मुंबईत पाण्याची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. अनेक ठिकाणी गळक्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय होत आहे. उद्याने आणि वाहने धुण्यासाठी शेकडो लीटर पाणी खर्ची घातले जात आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.मान्सूनला आणखी एक ते दीड महिन्याचा अवकाश आहे. त्याअगोदरच राज्यात भयावह दुष्काळ पसरला आहे. विशेषत: मराठवाड्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. राज्य सरकारनेही मदतीचा हात दिला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते दुष्काळग्रस्त विभागाचा दौरा काढून तेथील लोकांचे सांत्वन करीत आहेत.स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका आहे. खालापूर तालुक्यातील स्वमालकीच्या मोरबे धरणातून महापालिका शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करते. गेल्या वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडला. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाल्याने ७00 दशलक्ष पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. असे असतानाही यावर्षी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याचे दिसून आले आहे. मोरबे धरणाची पातळी ८८ मीटर इतकी आहे. म्हणजेच ८८ मीटर पातळी गाठल्यानंतर धरणात १९0.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. एप्रिलमध्ये या धरणात ९४.३७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक होता. हा जलसाठा साधारण १५ आॅगस्टपर्यंत पुरेल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी राज्यात सुरू असलेल्या पाणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेकडून कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. या शहरात विविध प्रांतासह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेले लोक राहतात. शहरात मुबलक पाणी मिळत असले तरी आपल्या मूळ गावी निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा जपून वापर करायला हवा, असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, शहरातील एमआयडीसी परिसरातील झोपडपट्ट्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे काही सिडको वसाहतीत सुद्धा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र ज्या विभागात अखंडित पाणीपुरवठा होत आहे, तेथे पाण्याची वारेमाप उधळपट्टी होताना दिसत आहे. नळाला पाइप लावून बिनधास्तपणे वाहने धुतली जात आहेत, तर काही ठिकाणी उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. छतावरील पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहतानाचे दृश्य ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. एमआयडीसी परिसरात गळक्या जलवाहिन्यांतून आजही मोठ्या प्रमाणात शेकडो लीटर पाणी वाहून जात आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.दिवसाला ३२७ एमएलडी पाणीमहापालिका मोरबे धरणासह उपलब्ध विविध स्रोतांच्या माध्यमातून दिवसाला एकूण ३२७ एमएलडी इतका पाणीपुरवठा करते. यात स्वत:च्या मोरबे धरणातून दिवसाला २१0 एमएलडी इतके पाणी घेतले जाते, तर एमआयडीसीकडून मिळणाºया ६0 एमएलडी पाण्याचा गावठाण आणि झोपडपट्ट्यांना पुरवठा केला जातो. सिडकोच्या हेटवणे धरणातून ३0 एमएलडी इतके पाणी घेतले जाते.सिडको नोड्सनाही पाणीपुरवठामोरबे धरणासह एमआयडीसी आणि सिडकोकडून महापालिकेच्या जलकुंभात दिवसाला ३२७ एमएलडी इतका पाणीसाठा होतो. यापैकी खारघर, कळंबोली व कामोठे या सिडको नोड्सना महापालिका पाणीपुरवठा करते. तर जलकुंभातील जवळपास २७0 एमएलडी इतके पाणी उपनगरांना पुरविले जाते.

टॅग्स :Waterपाणी