थकीत एलबीटी वसुलीचा नगरसेवकांचा पालिकेकडे तगादा, महासभेत पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:30 AM2017-12-21T01:30:13+5:302017-12-21T01:30:58+5:30
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ३३८ कारखानदारांकडे पालिकेचे एलबीटीच्या रूपाने जवळपास ४०० कोटी थकीत आहेत. ही थकीत रक्कम कधी वसूल होणार? यासंदर्भात सोमवारी महासभेत सत्ताधारी-विरोधक नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे वसुलीचा तगादा लावला. वर्षभराचा कालावधी लोटून देखील थकीत एलबीटी वसूल होत नसल्याने सभागृहात या विषयावर चर्चा करण्यात आली.
पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ३३८ कारखानदारांकडे पालिकेचे एलबीटीच्या रूपाने जवळपास ४०० कोटी थकीत आहेत. ही थकीत रक्कम कधी वसूल होणार? यासंदर्भात सोमवारी महासभेत सत्ताधारी-विरोधक नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे वसुलीचा तगादा लावला. वर्षभराचा कालावधी लोटून देखील थकीत एलबीटी वसूल होत नसल्याने सभागृहात या विषयावर चर्चा करण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी थकीत एलबीटी कारखानदारांसोबत वारंवार बैठक घेऊन एलबीटी भरण्याची विनंती केली. यासंदर्भात कारखानदारांनी ही रक्कम भरण्यास विरोध दर्शविला. संबंधित कारखानदारांना नोटिसा बजावून ही थकीत रक्कम भरण्याची विनंती देखील पालिकेच्या मार्फत करण्यात आली. कारखानदारांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याने ही वसुली लांबणीवर पडली आहे. यासंदर्भात नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. या वसुलीचे काय झाले? पालिकेच्या मार्फत योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा नगरसेवक नितीन पाटील यांनी देखील एलबीटी वसुलीसंदर्भात सेलटॅक्स दर्जाचा अधिकारी नेमणे गरजेचे असताना अद्याप किती अधिकारी याकरिता नेमले आहेत? ही रक्कम वसुलीसंदर्भात काही अधिकारी सेटिंग करीत असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला. यावर आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी उत्तर देताना सांगितले की, असे प्रकार सुरू असतील तर त्याची ठोस माहिती माझ्याकडे द्या. यासंदर्भात चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच आयुक्तांनी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना यासंदर्भात उत्तर देण्यास सभागृहात बोलावले. लेंगरेकर यांनी अद्याप एक अधिकारी या कामासाठी पालिकेत रुजू झाला आहे, उर्वरित अधिकाºयांच्या नेमणुकीसाठी जाहिरात काढण्यात आली असल्याचे सांगितले.
यासंदर्भात नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी एलबीटी व जीएसटीसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची मागणी करणार असल्याचे सभागृहात सांगितले. एलबीटी भरण्यास कारखानदार दिरंगाई करीत असतील तर त्यांचे कारखाने बंद पाडण्याचा अधिकार पालिकेला आहे, तेव्हाच कारखानदार वठणीवर येतील, अशी प्रतिक्रि या नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी दिली. ही रक्कम पालिकेकडे जमा झाल्यास पनवेलच्या विकासाला गती प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.