अवाढव्य भाडेदरामुळे व्यावसायिक गाळे ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:38 AM2020-02-24T00:38:25+5:302020-02-24T00:38:32+5:30

प्रशासन उदासीन; लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष; महापालिकेचे नुकसान

Due to the huge rents, commercial sludge dew | अवाढव्य भाडेदरामुळे व्यावसायिक गाळे ओस

अवाढव्य भाडेदरामुळे व्यावसायिक गाळे ओस

Next

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी मार्केट बांधण्यात आले असून मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. या गाळ्यांना रेडिरेकनरनुसार भाडे आकारले जाते. परंतु नागरिकांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी रेडिरेकनरच्या दरानुसार लावण्यात आलेले भाडे जास्त असल्याने त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसून गेल्या अनेक वर्षांपासून गाळे बंद अवस्थेत आहेत. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासन उदासीन आहे तसेच लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले आहे.

नवी मुंबई शहरातील नागरिकांना सुविधा देण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विधिध ठिकाणी मार्केट बांधण्यात आले आहेत. जागेचे ठिकाण, क्षेत्रफळ यानुसार शासनाने निर्देशित केलेल्या दरांप्रमाणे मार्केटमधील गाळ्यांना भाडे आकारले जाते. हे भाडे जागेच्या मूल्याच्या वार्षिक आठ टक्केप्रमाणे घेतले जाते.

शिरवणे भूखंड क्र मांक ७६१ ते ७६४ वर बांधण्यात आलेल्या मार्केटमधील सुमारे ८ गाळे बंद आहेत. श्रमिकनगर खैराणे येथील ३ आणि करावेमधील भूखंड क्र मांक १६० वर बांधण्यात आलेल्या गाळ्यांमधील १ गाळा असे सुमारे २४ गाळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेमध्ये आहेत.

१२ गाळे पाच वर्षांपासून बंदच
नागरिकांची वर्दळ आणि रहदारी कमी असलेल्या ठिकाणी तसेच काही ठिकाणी गाळे बांधण्यात आले आहेत तर काही ठिकाणी गाळ्यांचे क्षेत्रफळ कमी असून रेडिरेकनरनुसार भाड्याचे दर जास्त आहेत. त्यामुळे या गाळ्यांना प्रतिसाद मिळत नाही.
सीबीडी येथील महापालिकेच्या स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुलाच्या बाहेर गाळे बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी असल्याने तसेच भाड्याचे दर जास्त असल्याने यामधील सुमारे १२ गाळे गेल्या पाच वर्षांपासून बंद आहेत.

निविदांना प्रतिसाद नाही
सदर गाळे भाड्याने देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात आॅनलाइन आणि आॅफलाइन पद्धतीने निविदा मागविण्यात आल्या आहेत. परंतु या निविदांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून नुकसान टाळण्यासाठी ठोस निर्णय घेण्यास प्रशासन उदासीन असून लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Due to the huge rents, commercial sludge dew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.