प्राची सोनवणे, नवी मुंबईदिवाळीचा सण म्हटला तर नातेवाईक, मित्रपरिवाराचे तोंड गोड करुन या नात्यांना आणखी घट्ट केले जाते. सध्या बाजारातील मिठाईचे भाव पाहता ती खरेदी करताना ग्राहकांचे तोंड मात्र कडू होत आहे. सणानिमित्त वाढत्या मागणीनुसार मिठाईच्या किमतीतही १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मिठाईमध्ये इंदोरची सोनपापडी, बेसन लाडू, म्हैसूर पाक, मोहनथाळ, चॉको काजू बर्फी, काजू-अंजीर रोल या सर्वच प्रकारच्या मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चकली, चिवडा, शेव या खमंग पदार्थांबरोबरच काजू कतरी, मोतीचूर लाडू, मिक्स मिठाई, ड्रायफूट मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बाजारात साधारण मिठाई ४०० ते ८५० रु पये किलो आहे. मागील वर्षीच्या तुलनेत किलोमागे १२० ते १४० रुपयांची वाढ झालेली पहायला मिळते. सफेद पेढा ४२० रु पये किलो, केसर पेढा, मलाई पेढा ५२० रु पये किलो झाला असून काजू,पिस्ता, मलाई बर्फी ५१० ते ५४० रु पये किलोपर्यंत बाजारात मिळत आहे. सर्वाधिक पसंती असलेली काजू कतरी ६०० ते ६५० रु पये किलो आहे. ड्रायफ्रूटच्या कलिंगड, स्ट्रॉबेरी, संत्री, मँगो आकाराची मिठाई ८०० ते ८३० रु पये किलोच्या दराने विकली जात आहे. मोतीचूर, बुंदी लाडू ३२० रु पये किलो, ड्रायफ्रूट लाडू ६०० रु पये किलो आहे. दिवाळीसाठी स्पेशल सुकामेवा मिक्स खास मिठाईची पाकिटे उपलब्ध असून ८५० ते ९०० रु पये किलोपर्यंत आहे. डाएट कॉन्शियस आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी बाजारात बिनसाखरेच्या मिठाईलाही मोठ्या प्रमाणात मागणी असून त्याचे दर ४८० रु पये किलोपर्यंत आहे. रंगीबेरंगी तसेच सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या कागदाचा वापर करुन आकर्षक पॅकिंग केलेल्या ड्रायफ्रू टच्या बॉक्सकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येतो. सुक्या मेव्याच्या आकर्षक बॉक्सच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे.टिकाऊपणामुळे मिठाईपेक्षा चॉकलेटला पसंती मिळत आहे. कॉर्पोरट क्षेत्रात मिठाई, चॉकलेट भेट म्हणून देण्याचे प्रमाण वाढत आहे. विविध आकारातील चॉकलेट ३५० ते ६०० रुपये किलो या दराने मिळत असून एका किलोच्या पॅकमध्ये ८० चॉकलेट्स उपलब्ध आहेत.
महागाईमुळे दिवाळीत मिठाई, चॉकलेटचा गोडवा महागला
By admin | Published: November 10, 2015 12:48 AM