सुविधांअभावी पालिकेची स्पोर्ट्स नर्सरी बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 11:55 PM2019-04-15T23:55:27+5:302019-04-15T23:55:35+5:30
२०११ मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सीबीडीतील राजीव गांधी क्रीडा संकुलात स्पोर्ट्स नर्सरी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : शहरातील तीन ते सहा वयोगटातील लहान मुलांमध्ये क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण व्हावी, यासाठी २०११ मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सीबीडीतील राजीव गांधी क्रीडा संकुलात स्पोर्ट्स नर्सरी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाला पालकांनीही चांगला प्रतिसाद देत पाल्यांना सहभागी केले होते; परंतु स्पोर्ट्स नर्सरीसाठी स्वतंत्र जागा नसल्याने तसेच सुविधा उपलब्ध न झाल्याने तीन वर्षांतच हा उपक्र म बंद पडला, यामुळे महापालिकेचा मूळ उद्देश हवेत विरला आहे. लहान मुलांसाठी योग्य असलेला उपक्र म महापालिकेने सुरू करण्याची मागणी सध्या पालकांकडून होत आहे.
नवी मुंबई महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी आजवर अनेक वेगवेगळे उपक्र म राबविले आहेत. सध्या लहान मुलांना मोबाइल आणि टीव्हीचे वेड लागल्याने क्र ीडा क्षेत्रातील त्यांची आवड कमी होतआहे, त्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटत आहे. लहान वयातच मुलांमध्ये क्र ीडा क्षेत्राची आवड निर्माण होऊन त्यांचे शारीरिक स्वास्थ टिकावे आणि वाढावे, तसेच शहरात क्र ीडापटू घडतील या उद्देशाने महापालिकेने लहान मुलांसाठी स्पोर्ट्स नर्सरी उपक्र म सुरू केला होता. पालिकेने राबविलेल्या उपक्र माला पालकांनीही चांगला प्रतिसाद दिला. सीबीडी, सीवूड आणि नेरु ळ परिसरातील जवळपास ८० हून अधिक लहान मुले सहभागी झाली होती. आठवड्यातून चार दिवस संध्याकाळी दोन तास चालणाऱ्या उपक्र मात लहान मुलांचे वय, वजन आणि उंची यांची योग्य वाढ व्हावी, हा प्रामुख्याने उद्देश ठेवण्यात आला होता. लहान वयात सर्वच क्र ीडा खेळांची आवड निर्माण व्हावी, यासाठी धावणे, हॉलिबॉल, फुटबॉल, योगा सारखे खेळ प्रशिक्षकांमार्फत शिकविण्यात येत होते. क्रीडा नर्सरीमध्ये लहान मुलांना घेऊन येणाºया पालकांसाठीही क्रीडा संकुलावर योगा प्रशिक्षण केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. क्र ीडा संकुलावर स्पोर्ट्स नर्सरीसाठी स्वतंत्र जागा आणि आवश्यक सुविधा नसल्याने क्र ीडा संकुलावरच मुलांना प्रशिक्षण द्यावे लागत होते. तसेच या मैदानावर सुरू असलेले क्रि केट सामने यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दादेखील ऐरणीवर आला होता. अशा अनेक समस्यांमुळे लहान मुलांसाठी मोठी उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून सुरू केलेली स्पोर्ट्स नर्सरी अवघ्या तीन वर्षांतच बंद पडली. पालिकेने लहान मुलांसाठी सुरू केलेला स्पोर्ट्स नर्सरी उपक्र म पुन्हा सुरू करावा, अशी मागणी पालक करीत आहेत.
>शहरातील लहान मुलांना क्र ीडा क्षेत्राची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या माध्यमातून स्पोर्ट्स नर्सरी हा उपक्र म सुरू करण्यात आला होता. जागेची उपलब्धता पाहून नागरिकांच्या मागणीनुसार हा उपक्र म पुन्हा सुरू करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने सुविधादेखील निर्माण करून दिल्या जातील.
- नितीन काळे,
उपआयुक्त, क्र ीडा विभाग