खोपोलीत मैदाने नसल्याने क्र ीडा क्षेत्राला खीळ
By admin | Published: February 8, 2016 02:46 AM2016-02-08T02:46:48+5:302016-02-08T02:46:48+5:30
खोपोलीतील युवकांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला असला तरी क्र ीडा क्षेत्रात मात्र त्यांना अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही.
खालापूर : खोपोलीतील युवकांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला असला तरी क्र ीडा क्षेत्रात मात्र त्यांना अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही. शहरात खेळण्यासाठी मैदानेच नसल्याने अनेकांना सरावही करता येत नाही. जनता विद्यालय व कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलचे क्र ीडांगण हे दोनच पर्याय सध्या खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत. गुणवत्ता असतानाही पुरेशी मैदाने व सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक खेळाडू आजही संधीची वाट पाहात आहेत. खोपोलीतील सत्ताधाऱ्यांना मात्र याचे सोयरसुतक नसल्याने शहरातील क्र ीडा क्षेत्रालाच खीळ बसली आहे.
खोपोली नगरपालिकेच्या विकास आराखड्यात स्टेडियम आणि क्रीडांगणासाठीचे आरक्षण आहे. मात्र याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष न दिल्याने खेळाडूंच्या अनेक पिढ्या नष्ट झाल्या आहेत. विविध स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू आणि हौशी खेळाडूंना सरावासाठी क्रीडांगण हवे, यासाठी २००३ ला तत्कालीन नगराध्यक्ष रामदास शेंडे यांच्यासह मारुती आडकर, अविनाश तावडे, शंकर दळवी, गुरुनाथ साठेलकर आदींनी पाठपुरावा करून जिल्हा क्रीडा खात्याकडून हाळ परिसरात क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव नगरपालिका सभागृहात मंजूर करून घेतला होता. रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी नगरपालिकेच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देत क्र ीडा संकुलासाठी सिल्वर पॅकेजनुसार सुमारे ७५ लाख रुपयाचा निधीही मंजूर केला होता. रामदास शेंडे पायउतार झाल्यानंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी त्या मंजूर पॅकेजच्या रकमेतून या क्षेत्रात फक्त भराव आणि संरक्षक भिंत बांधण्यापलीकडे काहीही केले नाही. अर्धवट अवस्थेत असलेल्या संरक्षक भिंतीचा सांगाडा आणि माजलेले रान मैदानावर सध्या पाहायला मिळते.
खोपोलीतील क्रीडाप्रेमींना आपली हौस भागविण्यासाठी जनता विद्यालयाच्या क्रीडांगणाचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक खेळाडू जमेल त्या ठिकाणी सराव करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते. खोपोलीत तरण तलावही नसल्याने अनेक जलतरणपटू या एज्युकेशन सोसायटी, रिशीवन किंवा यूके रिसॉर्टसारख्या ठिकाणी खिशाला अधिकचा भुर्दंड सोसून सराव करताना दिसतात.
क्रिकेट आणि फुटबॉलप्रेमी कोणत्याही मोकळ्या जागेवर तात्पूरते क्रीडांगण तयार करून खेळतात. याच तात्पुरत्या क्र ीडांगणावर क्रि केट व फुटबॉलच्या स्पर्धाही भरविल्या जातात.