पथदिवे नसल्याने महामार्गावर अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:13 AM2019-04-04T02:13:25+5:302019-04-04T02:13:40+5:30

पनवेलमधील मुंबई-गोवा मार्ग : रात्रीच्या वेळी वळण, दुभाजकांचा अंदाज येत नसल्याची चालकांची तक्रार

Due to lack of street light, the danger of accidents on the highway | पथदिवे नसल्याने महामार्गावर अपघाताचा धोका

पथदिवे नसल्याने महामार्गावर अपघाताचा धोका

Next

कळंबोली : रस्ते विकास महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केले आहे. मात्र, अनेक ठिकाणी पथदिवे लागलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या मार्गावर टोल वसुली सुद्धा होते, मग सोयी-सुविधा मिळत नसल्याने चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पनवेल शहरातून जातो. कळंबोली सर्कल ते खांदा वसाहतीपर्यंत महामार्गावर रस्ते विकास महामंडळाने पथदिव्यांची सोय केलेली नाही. पनवेल येथील पंचमुखी हनुमान मंदिरापासून शेडूंग टोल नाक्यापर्यंतही पथदिवे नाहीत. महामार्गाच्या बाजूला खांदा वसाहत, भिंगारी, कोन, अजीवली लोकवस्ती आहे. त्यामुळे या महामार्गावर स्थानिकांचीही वर्दळ जास्त असते.
पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना लहान-मोठे अपघात होतात. चालकांनाही अंधारात दुभाजक व रस्ता क्रॉसिंग करत असलेले व्यक्ती दिसत नाहीत, तसेच धोदाकायक वळणसुद्धा नजरेस पडत नाहीत. कळंबोली सर्कल येथून पनवेल शहरात अवजड वाहनांना बंदी आहे. आसुडगाव परिसरात पेट्रोल पंप असल्याने पेट्रोल भरण्यासाठी अंधाराचा फायदा घेऊन अवजड वाहने या मार्गावर शिरकाव करतात. भिंगारी येथे रस्ता वळणाचा असल्याने अपघातात भर पडते. वाहने भरधाव येत असल्याने कित्येक ग्रामस्थांच्या जीवावर बेतले आहे. या विरोधात रास्ता रोकोही केला. मात्र, काहीच उपयोग झाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पळस्पे जंक्शनवरही काळोख
पळस्पे फाटा येथे उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्यांच्या मध्यभागी, बाजूला खोदकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी पथदिवे नसल्याने अंधारात काहीच दिसत नाहीत. त्यामुळे वारंवार वाहतूककोंडी व अपघात होतात. संबंधित विभागाकडे वाहतूक पोलिसांकडून पाठपुरावा करण्यात आलेला आहे.

च्कळंबोली सर्कल ते पनवेल ओएनजीसीपर्यंतच्या राष्टÑीय महामार्गावर उन्नत पूल तसेच खांदा वसाहत येथे नव्याने उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.
च्या पुलावर पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र, खालून जाणाऱ्या महामार्गावर पथदिवे नसल्याने चालकांची गैरसोय होत आहे. शिवाय लोकवस्तीतून महामार्ग जात असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

महामार्ग पनवेल शहर तसेच इतर नागरी वसाहतीतून जातो. त्यामुळे तिथे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून सिडको, महापालिका किंवा इतर यंत्रणांनी पथदिव्यांची सोय करणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांना सूचनाही दिल्या आहेत.
- संजय गागुर्डे,
कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

Web Title: Due to lack of street light, the danger of accidents on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.