- राजू काळे, भार्इंदरसावत्र आईसह तिची आई, बहिण व वहिनीने १२ वर्षीय दश खानझोडेवर केलेल्या अमानुष अत्याचाराला कंटाळून तो गेल्या २ जुलै पासून आसनागाव येथून बेपत्ता झाला असून कल्याण रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही अत्याचाराची घटना कसाऱ्याच्या कोळीपाडा परिसरात घडली असून तेथील लोकांनी दशच्या जीविताबाबतच संशय व्यक्त केला आहे.दशचे वडील रामदास यांनी त्याला शिक्षणासाठी नाशिक येथे ठेवले होते. त्याच्या संगोपनासह स्वत:च्या एकाकी जीवनाला जोडीदार असावा, यासाठी शेजारील एका व्यक्तीच्या मध्यस्थीने त्यांचा २०१४ मध्ये लता दत्तात्रय जाधव हिच्यासोबत विवाह करुन दिला. पूर्वी विवाह होऊन ती नाशिक येथे राहण्यास गेली होती. परंतु, ती तेथे नांदत नसल्याने तिला रामदास यांच्या घरी देण्यात आले. ती आल्यानंतर त्याने दशला नाशिकहुन कसाऱ्यात आणून स्थानिक शाळेत दाखल केले. त्यानंतर त्याची सावत्र आई लता, तिची आई शैला, बहिण मालिनी व वहिनी अस्मा विष्णू जाधव यांनी त्याला घरातील काम करण्यास भाग पाडले. खेळण्या-बागडण्याच्या वयात त्याला चौघींचा अत्याचार सहन करावा लागत असे. त्याच्या हाता-पायावर चटके देऊन डोक्यावरील एका बाजूचे केस कापून पायाला जखमा करुन त्याला विद्रुपतेच्या दारी लोटण्यास सुरुवात केली. शाळेत दाखल केल्याचे त्याचे आईवडील सांगत असले तरी या अवस्थेत तो कोणत्या शाळेत जात होता, यावरही शेजाऱ्यानी शंका व्यक्त केली आहे. तो २ जुलै रोजी लतासोबत आसनगाव येथे गेला असता तेथून तो बेपत्ता झाल्याचे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे. त्याला मारु नका, पुन्हा नाशिकच्या शाळेत पाठवा, अशी विनंती त्यांना केल्याचे लताचे चुलते चंद्रकांत जाधव यांनी लोकमत प्रतिनिधीला सांगून तसा जबाब पोलिसांना दिला आहे. परंतु, त्यांनीही दशलाच दोषी ठरवून जाधव यांच्या विनंतीला धुडकावले.ग्रामस्थांनी मांडले वास्तवदशवरील अत्याचाराबाबत शेजाऱ्यांनी कसारा रेल्वे पोलिसांत लेखी तक्रार केली आहे. त्याची अवस्था पळून जाण्यासारखी नसताना तो नेमका कुठे गेला, यावर ग्रामस्थ शंका व्यक्त करीत आहेत. याबाबत ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक अविनाश अंबुरे यांनी सांगितले की, घटनेची माहिती कसारा पोलिसांसह कल्याण रेल्वे पोलिसांना दिली असून ते त्याचा तपास करीत आहेत.
सावत्रांच्या अत्याचाराला कंटाळून दश झाला बेपत्ता
By admin | Published: July 18, 2015 11:43 PM