कच-यामुळे ठाणे-वाशी लोकल घसरण्याची भीती!, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:44 AM2017-12-10T06:44:09+5:302017-12-10T06:44:26+5:30

ठाणे-ऐरोलीदरम्यान कळव्यातील ठाणे-वाशी या रेल्वे ट्रॅकवर पसरलेल्या कचºयामुळे या रेल्वेमार्गावरून धावणाºया ठाणे-वाशी अथवा ठाणे-पनवेल लोकल घसरण्याची भीती रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

 Due to the scarcity of Thane-Vashi local fear, the ignorance of Municipal Corporation | कच-यामुळे ठाणे-वाशी लोकल घसरण्याची भीती!, महापालिकेचे दुर्लक्ष

कच-यामुळे ठाणे-वाशी लोकल घसरण्याची भीती!, महापालिकेचे दुर्लक्ष

Next

पंकज रोडेकर / लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे-ऐरोलीदरम्यान कळव्यातील ठाणे-वाशी या रेल्वे ट्रॅकवर पसरलेल्या कचºयामुळे या रेल्वेमार्गावरून धावणाºया ठाणे-वाशी अथवा ठाणे-पनवेल लोकल घसरण्याची भीती रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे. जर या मार्गावर लोकल घसरली, तर हा मार्ग पूर्ण ठप्प होऊन प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतील. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळीच ट्रॅकवरील आणि त्याच्या आजूबाजूला पसरलेला कचरा हटवण्याची मागणी रेल्वेने केली आहे. पुन:पुन्हा ट्रॅकवर कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी घेण्याबद्दल पालिकेला बजावले आहे.
मध्य रेल्वेच्या जलद मार्गालगत ठाणे-वाशी-पनवेल हा मार्ग आहे. या मार्गावर अप आणि डाउन असे दोनच ट्रॅक आहेत. कळवा-विटावा ब्रिज येथून मध्य रेल्वे आणि ठाणे-वाशी हे मार्ग वेगळे होतात. ठाणे-वाशी मार्ग जेथे वेगळा होतो, तेथे एक वळण आहे. या दोन्ही मार्गांच्या मधोमधच मोठी झोपडपट्टी पसरली आहे. बहुतेक लोक हे परभाषिकआहे. ही झोपडपट्टी एकाच बाजूला असल्याने महापालिका प्रशासनाचे नेहमीच तिकडे दुर्लक्ष होते. तेथे राहणाºया नागरिकांना कचरा टाकण्याची व्यवस्था नसल्याने ते थेट रेल्वे ट्रॅकवर कचरा टाकतात. फेकलेल्या कचºयाचा ढीग हा वळण असलेल्या ट्रॅकच्या आजूबाजूला आहे. जवळपास ३०० ते ४०० मीटर अंतरावर कचºयाचे साम्राज्य पसरल्याचे दिसते. या मार्गावरील लोकल अक्षरश: त्या कचºयातूनच धावते. त्याच झोपडपट्टीतील नागरिक रेल्वे ट्रॅकलगत शौचास जात असल्याने येथून लोकल धावते, तेव्हा प्रवाशांना नाक दाबूनच प्रवास करावा लागतो.
बुधवारी दिवा-पारसिक बोगद्यापाशी कल्याणहून तुर्भे येथे जाणाºया मालगाडीचा एक डबा कचरा रेल्वेमार्गात आल्याने घसरला. या घसरलेल्या डब्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर त्याचा विपरित परिणाम झाला होता. तो मालगाडीचा डबा असल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, कचºयामुळे लोकलचा डबा घसरण्याची पुनरावृत्ती झाल्यास जीवितहानी होऊ शकते.
ठाणे-वाशी मार्गावर लोकल घसरून अपघात होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन आता नेमके कसे पाऊल उचलते, याकडे प्रवाशांचे डोळे लागले आहेत. तसेच तेथील नागरिकांनी आम्हाला कचरा टाकण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने हा कचरा रेल्वे ट्रॅकवर टाकावा लागत आहे. महापालिकेने तशी व्यवस्था करून कचरा वेळेवर उचलावा, अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.

Web Title:  Due to the scarcity of Thane-Vashi local fear, the ignorance of Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.